Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

अर्जुन : कोणत्या करदात्यास रिकामा गिफ्ट बॉक्स मिळाला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:25 AM2019-12-23T06:25:50+5:302019-12-23T06:26:17+5:30

अर्जुन : कोणत्या करदात्यास रिकामा गिफ्ट बॉक्स मिळाला का?

What Gifts from Santa Claus of GST | जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, रिव्रसमस सण जवळ येत आहे. ३८ व्या जीएसटी परिषदेची बैठक १८ डिसेंबर २०१९ ला होती. त्या निमित्ताने करदात्यांना परिषदेकडून रिव्रसमसची भेट मिळत आहे का?

कृष्ण : (काल्पनिक पात्र) : अजुर्ना, जीएसटी परिषदेची ३८ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत करदात्यांना रिव्रसमस निमित्ताने भेटवस्तू मिळाल्या. ज्यात देय तारखेच्या मुदतवाढीसाठी शिफारस करण्यात आली. महसूलमध्ये ४० टक्क्याने घसरण झाल्याने तणावग्रस्त सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तू कमी झाल्या आहेत.

अर्जुन : कृष्णा, तणावग्रस्त सांताच्या बॅगमधून मिळालेल्या भेटवस्तू काय आहेत?

कृष्ण : तणावग्रस्त सांताच्या बॅगमधून पुढील भेटवस्तू निघाल्या : १. देय तारखांची मुदतवाढ : अ) आर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचे फॉर्म जीएसटीआर-९ म्हणजेच वार्षिक रिटर्न आणि फॉर्म जीएसटीआर-९ सी म्हणजेच आॅडिट रिपोर्ट यांची देय तारीख ३१ जानेवारी २०२० पर्यंत वाढवली आहे.

ब) ईशान्येकडील काही राज्यांत नोव्हेंबर २०१९ चे जीएसटी रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाली. २.जीएसटीआर-१ची सुगम फाइलिंग: जुलै २०१७ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंतचे जीएसटीआर-१ जर १० जानेवारी २०२० पर्यंत दाखल केले तर त्यावरील लेट फी माफ होईल. ३. तक्रार निवारण समिती: ही विभागीय / राज्यपातळीवर सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही अधिकाऱ्यांसह, व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींसह आणि जीएसटीच्या अन्य भागधारकांसह (जीएसटी पॅ्रक्टिशनर आणि जीएसटीएन) स्थापन केले जाईल.
या समित्या विभागीय / राज्य स्तरावर करदात्यांच्या विशिष्ट/सामान्य स्वरूपाच्या तक्रारींकडे लक्ष देतील.

अर्जुन : कोणत्या करदात्यास रिकामा गिफ्ट बॉक्स मिळाला का?
कृष्ण : सांताच्या बॅगमधून काही असे गिफ्ट निघाले आहेत ज्यात काहीही समाविष्ट नाही : १. दोन कर कालावधीसाठी ज्या करदात्यांनी फॉर्म जीएसटीआर-१ दाखल केलेला नाही त्यांचे इ-वे बिल जनरेट होणार नाहीत. २. करदात्यांच्या फॉर्म जीएसटीआर-२ए मध्ये प्रतिबिंबीत न झालेल्या इनव्हाइस किंवा डेबिट नोटसच्या संदर्भात आयटीसी १ जानेवारी २०२० पासून त्यांच्या फॉर्म जीएसटीआर-२ए मध्ये प्रतिबिंबीत पात्र आयटीसीच्या १० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. पूर्वी हे निर्बंध २० टक्के होते.
३. बनावट पावत्या तपासण्यासाठी काही विशिष्ट घटनांमध्ये फसवणूक करून घेतलेले आयटीसी रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही होईल.
अर्जुन : सांताच्या बॅगमधील इतर गोष्टी कोणत्या?
कृष्ण : सांताच्या बॅगमधील इतर गोष्टी पुढीलप्रमाणे:
अ) जीएसटी दरामधील बदल :
१. राज्यांनी चालवलेल्या आणि राज्य अधिकृत लॉटरी या दोन्हीवर २८ टक्के जीएसटी असेल. हा बदल १ मार्च २०२० पासून लागू होईल. २. जर कोणत्याही संस्थेकडे राज्य किंवा केंद्र सरकारच्या औद्योगिक/आर्थिक प्लॉटच्या २० टक्क्याहून अधिक मालकी असेल, तर त्यावरील दीर्घ भाडेपट्टीस सूट मिळेल. हा बदल १ जानेवारी २०२० पासून लागू होईल. ३. विणलेल्या व न विणलेल्या बॅग आणि पॉलिथिलीन किंवा पोलीप्रोपाईलिनच्या पोत्यावरील जीएसटी दर, १८ टक्केपर्यंत (१२ टक्क्यापासून) वाढवण्याची शिफारस आहे. हा बदल १ जानेवारी २०२० पासून लागू होईल.

ब) प्रकियेमध्ये बदल :
१. फॉर्म जीएसटीआर-३बी दाखल न केल्यास कर अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही याबाबत स्टॅडैड आॅपरेटिंग प्रोसिजर लागू होईल. २. २०२० च्या अर्थसंकल्पात सादर विविध कायदा दुरुस्तींनाही परिषदेने मान्यता दिली.
अर्जुन : करदात्यांनी काय बोध घ्यावा ?
कृष्ण : या आर्थिक वर्षात जीएसटीच्या महसुलात घट झाल्याचीही चर्चा झाली, महसूल घटल्यामुळे करदात्यास सरकार अधिक लाभ देईल, अशी अपेक्षा ठेवणे अवघड आहे. महसूल घटल्याने करदात्याने अधिक नोटिसांना सामोरे जायला तयार असले पाहिजे.

Web Title: What Gifts from Santa Claus of GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.