Lokmat Money > बिझनेस न्यूज > काेणती गुंतवणूक कराेडपती बनवेल?; म्युच्युअल फंड की पीपीएफ?

काेणती गुंतवणूक कराेडपती बनवेल?; म्युच्युअल फंड की पीपीएफ?

या दाेनपैकी काेणती याेजना तुम्हाला लवकर कराेडपती बनवेल? हे पाहू या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 07:57 AM2023-02-25T07:57:44+5:302023-02-25T07:58:14+5:30

या दाेनपैकी काेणती याेजना तुम्हाला लवकर कराेडपती बनवेल? हे पाहू या.

What Investment Will Make a Millionaire?; Mutual Fund or PPF? | काेणती गुंतवणूक कराेडपती बनवेल?; म्युच्युअल फंड की पीपीएफ?

काेणती गुंतवणूक कराेडपती बनवेल?; म्युच्युअल फंड की पीपीएफ?

मुंबई - असे म्हणतात की, पैसा पैशाला ओढताे. भविष्यात भरपूर पैसे हातात हवे असतील, तर तुम्हाला तुमच्याकडील पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवावा लागेल. चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळताे आणि तुमची संपत्ती वाढते. पैसा गुंतविण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यापैकी दाेन चांगले पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्राॅव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफ. अशा याेजनांमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास पैसा माेठा हाेताे. या दाेनपैकी काेणती याेजना तुम्हाला लवकर कराेडपती बनवेल? हे पाहू या.

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ५०० रुपयेही गुंतविता येतात.

एसआयपीमध्ये दरमहा १० हजार रुपये गुंतविल्यास...

वार्षिक गुंतवणूक - १.२० लाख रुपये
२० वर्षांमधील गुंतवणूक - २४ लाख रुपये
सरासरी वार्षिक परतावा - १२% 
परताव्याची रक्कम - ७५,९१,४७९ रुपये
२० वर्षांमध्ये रक्कम - ९९,९१,४७९ रुपये

म्हणजेच, २० वर्षांमध्ये सुमारे १ काेटी रुपयांची रक्कम जमा झालेली असेल. ८८,६६,७४ रुपये परतावा मिळेल हीच गुंतवणूक आणखी १ वर्ष सुरू ठेवल्यास. १ काेटी १३ लाख ८६ हजार रुपये २१ वर्षांनी मिळतील. 

पीपीएफ ही सरकारी याेजना असून, त्यात परताव्याची हमी असते. जाेखीम कमी असते. १५ वर्षांची याेजना आहे.दर ५ वर्षांच्या ब्लाॅकमध्ये याेजना तीनवेळा वाढवायला हवी.

दरमहा १० हजार रुपये गुंतविल्यास...

वार्षिक गुंतवणूक - १.२० लाख रुपये
२८ वर्षांमधील गुंतवणूक - ३३.६० लाख रुपये
सध्याचा व्याजदर - ७.१%
परताव्याची रक्कम - ७१,८४,१४२ रुपये
२८ वर्षांमध्ये रक्कम - १,०५,४४,१४२ रु.

Web Title: What Investment Will Make a Millionaire?; Mutual Fund or PPF?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.