अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने ई-कॉमर्ससह इतर खाद्य कंपन्यांनाही पॅकेटने ‘ए-वन’ आणि ‘ए-टू’ प्रकारचे दूध आणि डेअरी प्रोडक्टचे दावे हटविण्याचे आदेश दिले आहेत. एफएसएसएआयने (FSSAI) म्हटले आहे की, हे दावे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅक्ट, 2006 नुसार नाहीत. आता एफएसएसएआयने नुकत्याच काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. ए-वन (A1) आणि ए-टू (A2) तील अंतर दुधातील बीटा-केसीन प्रोटीनच्या स्ट्रक्चरशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.
सध्याचे एफएसएसएआय नियम या फरकाला मान्यता देत नाहीत. फूड बिझनेस ऑपरेटर्सचा उल्लेख करत FSSAI ने म्हटले आहे की, "एफबीओला आपल्या प्रोडक्ट वरून अशा प्रकारचे दावे हटविण्याचे आदेश दिले आहेत." याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनही अशा प्रकारचे दावे तत्काळ हटविण्यास सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कंपन्यांना आधीपासूनच प्रिंट लेबल संपविण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. यानंतर कसल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही.
बीटा-केसीन प्रोटीनचे स्ट्रक्चर वेगवेगळे -A-1 आणि A-2 दुधात बीटा-केसिन प्रोटीनचे स्ट्रक्चर वेग वेगळे असते, जे गायीच्या जातीनुसार वेगवेगळे असते. या सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे नियामकाने म्हटले आहे.
काय आहेत A1 आणि A2 प्रोटीन...? -ए-1 हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. हे गायीच्या दुधात आढळते. ते जेव्हा पचवले जाते तेव्हा एक अशा प्रकारचे पेप्टाइड तयार होते ज्याला बीटा-केसिन ए1-कॅसोमॉर्फिन-7 (बीसीएम-7) म्हटले जाते. काही लोकांच्या मते गे पेप्टाइड पाचन तंत्राशी संबंधित समस्यांचे कारण बनू शकते. याशिवाय ए-2 देखील एक प्रकारचे प्रोटीन आहे. हेही गायीच्या दुधातच आढळते. ए-1 आणि ए-2 या दोन्ही प्रकारच्या दुधात बीटा-केसीन प्रोटीनचे स्ट्रक्चर वेगवेगळे असते.