आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधी आधार कार्ड आवश्यक दस्तऐवजांपैकी एक आहे. बँक खाते उघडणं असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणं असो, पासपोर्ट मिळवणं असो किंवा एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवणे असो, आधार नंबरची मागणी जवळपास सर्वत्र केली जाते. देशात आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक ब्लू आधार कार्ड देखील आहे. तुम्ही कधी ब्लू आधार कार्ड पाहिलंय का? ब्लू आधार कार्ड म्हणजे काय आणि ते कोणाला मिळू शकतं हे याची कल्पना आहे का?
काय आहे ब्लू आधार कार्ड?
२०१८ मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) लहान मुलांसाठी आधार कार्डाची सुविधा सुरू केली होती. याला बाल आधार किंवा ब्लू आधार असं म्हणतात. याला ब्लू आधार कार्ड असं म्हटलं जातं कारण ते निळ्या रंगात येतं. ब्लू आधार कार्ड ५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचं तयार केलं जातं. ५ वर्षानंतर ते तुम्ही अपडेट करू शकता.
बायोमॅट्रिकची गरज नाही
निळा बेस सामान्य बेसपेक्षा थोडा वेगळा आहे. ब्लू आधार बनवण्यासाठी ५ वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. त्यांच्या UID वर त्यांच्या आईवडिलांच्या युआयडीशी निगडीत डेमोग्राफिक माहिती आणि चेहऱ्याच्या आधारावर मुलांचं आधार प्रोसेस केलं जातं. ही मुलं ५ आणि १५ वर्षांची झाल्यावर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करावे लागतील.
काय आहे प्रोसेस?
- सर्वप्रथम UIDAI ची वेबसाईट uidai.gov.in वर जा.
- आधार कार्ड रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.
- मुलाचं नाव, पालक/गार्डियन यांचा फोन नंबर आणि आवश्यक माहिती द्या.
- आता आधारच्या अपॉइंटमेंटसाठीच्या पर्यायवर क्लिक करा.
- जवळचं एनरॉलमेंट सेंटर पाहून अपॉइंटमेंट घ्या.
- तुमचं आधार, मुलांचं बर्थ सर्टिफिकेट, रेफरन्स नंबर घेऊन आधार सेंटरवर जा.
- त्या ठिकाणी तुम्हाला आधार बनवून मिळेल.
- यानंतर तुम्हाला एक अॅक्नॉलेजमेंट नंबर दिला जाईल. याद्वारे तुम्ही ट्रॅक करू शकता.