Join us  

डार्क पॅटर्न म्हणजे काय? मोदी सरकारनं लोकांकडून मागवल्या सूचना; दिला सतर्क राहण्याचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 9:36 PM

Dark Patterns: महत्वाचे म्हणजे, डार्क पॅटर्न म्हणजे नेमके काय? हे अनेकांना माहीत नाही.

 'डार्क पॅटर्न'संदर्भात लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता सरकारनेही पावले उचलायला सुरुवात केली असून लोकांकडून त्यांची मतं अथवा सूचना मागवल्या आहेत. खरे तर, सरकारने डार्क पॅटर्नच्या प्रतिबंधासाठी आणि नियमनासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर लोकांची मतं अथवा सूचना मागवल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, डार्क पॅटर्न म्हणजे नेमके काय? हे अनेकांना माहीत नाही.

डार्क पॅटर्न म्हणजे काय? -ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी अथवा त्यांच्या  पसंतीमध्ये फेरफार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीला डार्क पॅटर्न म्हटले जाते. यासंदर्भात आता, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे अवलंबल्या जाणार्‍या ग्राहकांच्या हिता विरोधातील अनेक फसव्या पद्धतींची यादी तयार करण्यात आली आहे.

मंत्रालयानं 30 दिवसांपर्यंत मागवलं सार्वजनिक मत -अधिकृत निवेदनानुसार, मंत्रालयाने पुढील 30 दिवसांपर्यंत (5 ऑक्टोबर) मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर सार्वजनिक मत अथवा सूचना मागविण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही मार्गदर्शक तत्त्वे विक्रेते आणि जाहिरातदारांसह सर्व लोकांसाठी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठीही लागू केले जातील. यासंदर्भात, ज्यांना सूचना अथवा आपले मत द्यायचे आहे, ते देऊ शकतात.

मंत्रालयाने म्हटले आहे, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि निष्पक्ष तसेच पारदर्शक बाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे ही उद्योगांना अधिक बळकटी देतील आणि ग्राहकांच्या हिताचेही संरक्षण करतील.

टॅग्स :केंद्र सरकारधोकेबाजीभाजपानरेंद्र मोदी