Lokmat Money > बिझनेस न्यूज > इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व

इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व

आजच्या काळात इमर्जन्सी फंड तयार करणं अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर लोकांना या निधीचं महत्त्व अधिक समजलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:06 PM2023-10-13T15:06:12+5:302023-10-13T15:08:39+5:30

आजच्या काळात इमर्जन्सी फंड तयार करणं अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर लोकांना या निधीचं महत्त्व अधिक समजलं.

What is Emergency Fund How much money to save every month is necessary read the importance | इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व

इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व

Emergency Fund Calculator : इमर्जन्सी फंड  (Emergency fund ) तयार करण्याबाबत लोक अनेकदा सल्ला देत असतात. तुम्ही कितीही कमावत असला तरी इमर्जन्सी फंड (Emergency fund calculator) म्हणून तुमच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवणं महत्त्वाचं आहे. पण इमर्जन्सी फंड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या काळात इमर्जन्सी फंड तयार करणं अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर लोकांना या निधीचं महत्त्व अधिक समजलं. इमर्जन्सी फंड (Emergency fund calculator) किती ठेवला पाहिजे याबाबतही अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे.

का आवश्यक आहे इमर्जन्सी फंड?
जेव्हा तुम्हाला अचानक जास्त पैशांची गरभ भासते तेव्हा इमर्जन्सी फंड कामी येतो. तो जर नसेल तर तुम्हाला एफडी किंवा अन्य गुंतवणूकांमधून पैसे काढावे लागतील. जेव्हा एखादी इमर्जन्सी असेल, नोकरी गेली, व्यापारात नुकसान झालं किंवा उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असेल तर तुम्हाला हा इमर्जन्सी फंड कामी येईल, यासाठी इमर्जन्सी फंड तयार करण आवश्यक आहे.

किती असावा फंड
इमर्जन्सी फंडाची रक्कम तुमचा पगार आणि खर्च यावर अवलंबून असायला हवी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुमचा पगार कितीही असो तुमच्याकडचा इमर्जन्सी फंड त्याच्या सहा पट असायला हवा. जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा तो निधी तुम्हाला वापरता येईल.
जर तुम्ही महिन्याला ५० हजार रुपये कमावता असं जर गृहीत धरलं, तर तुम्हाला किमान ३ लाख रुपयांचा इमर्जन्सी फंड बनवावा लागेल. तसंच हा बचत किंवा गुंतवणूकीचा भागही नसावा.

हेदेखील आहे आवश्यक
जर तुम्हाला चांगली बचत करायची असेल तर तुमचे सर्व पैसे एकाच ठिकाणी कधीही गुंतवू नका. तुम्ही एफडी, बँक बचत खातं, म्युच्युअल फंड, आरडी, सरकारी योजनांसह अनेक ठिकाणी छोटी रक्कम गुंतवू शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं.

Web Title: What is Emergency Fund How much money to save every month is necessary read the importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.