आर्थिक वर्ष २०२२- २३मध्ये जीडीपी वाढीत घसरण झाली असून ती ७.२ टक्के इतकी झाली आहे. आर्थिक वर्ष २२मध्ये ही वाढ ९.१ टक्के इतकी होती. देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) नेमका कसा काढतात ते जाणून घेऊ...
आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले की...
चौथ्या २०२३ च्या चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी ५.१ टक्के वाढण्याचा अंदाज आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने हाच दर ५.५ टक्के इतका राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
२०२३ या वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ ७.१ टक्के अपेक्षित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२३ चा जीडीपी वाढीचा दर ७ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
जीडीपी म्हणजे काय?
जीडीपी हा अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वांत सामान्य निर्देशकांपैकी एक आहे.
जीडीपी देशामध्ये विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकत्रित मूल्य दर्शवते.
यात देशाच्या हद्दीत राहून उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. जेव्हा अर्थव्यवस्था सुदृढ असते तेव्हा देशातील बेरोजगारीची पातळी कमी असते.
किती प्रकारचे असतात जीडीपी?
जीडीपीचे दोन प्रकार आहेत. वास्तविक जीडीपी आणि आणि नाममात्र जीडीपी. वास्तविक जीडीपीमध्ये, वस्तू आणि सेवांचे मूल्य मूळ वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किमतीवर मोजले जाते.
सध्या जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष २०११-१२ हे आहे.
म्हणजे २०११-१२ मधील वस्तू आणि सेवांच्या दरांनुसार गणना केली आहे. नाममात्र जीडीपी सध्याच्या किमतीवर मोजला जातो.
असा काढतात जीडीपी : पुढील सूत्र वापरले जाते.
जीडीपी = खासगी उपभोग, सरकारी खर्च, गुंतवणूक, निव्वळ निर्यात