Lokmat Money > बिझनेस न्यूज > KYC म्हणजे काय? वेळोवेळी अपडेट करणे का आहे महत्त्वाचे? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

KYC म्हणजे काय? वेळोवेळी अपडेट करणे का आहे महत्त्वाचे? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

What Is KYC : KYC हा बँक किंवा कंपनीसाठी ग्राहकाची ओळख सुनिश्चित करण्याचा एक मार्ग आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, नवीन ग्राहक आणि जुने ग्राहक या दोघांनी केवायसी प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:47 AM2024-11-06T11:47:39+5:302024-11-06T11:49:11+5:30

What Is KYC : KYC हा बँक किंवा कंपनीसाठी ग्राहकाची ओळख सुनिश्चित करण्याचा एक मार्ग आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, नवीन ग्राहक आणि जुने ग्राहक या दोघांनी केवायसी प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.

what is kyc why is it important to redo your kyc all you need to know | KYC म्हणजे काय? वेळोवेळी अपडेट करणे का आहे महत्त्वाचे? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

KYC म्हणजे काय? वेळोवेळी अपडेट करणे का आहे महत्त्वाचे? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

What Is KYC : सरकारी योजनांपासून बँकांपर्यंत केवायसी करुन घ्या, असे शब्द तुमच्याही कानावर पडले असतील. जेव्हा तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. केवायसी म्हणून सबमिट केलेली ही कागदपत्रे तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी आहेत. खाते उघडल्यानंतरही केवायसी अपडेटसाठी वेळोवेळी सांगितलं जातं. पण, KYC म्हणजे नेमकं काय? त्याने काय होतं? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित होत असतील. आज आम्ही तुम्हाला केवायसीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

KYC म्हणजे काय?
केवायसी म्हणजे तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या. (Know Your Customer) ही ग्राहक आइडेन्टिफिकेशन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, ग्राहक केवायसी फॉर्मसह आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटो कॉपी जमा करतात. सर्व कंपन्या, बँका, सरकारी योजना आणि वित्तीय संस्था या दस्तऐवजात ग्राहकाशी संबंधित माहिती गोळा करतात. जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्या व्यक्तीची ओळख पटू शकेल.

केवायसीचे नियम
ग्राहक ओळख प्रक्रियेअंतर्गत कंपन्या किंवा बँका ओळख आणि पत्त्यासाठी मान्यताप्राप्त कागदपत्रे घेतात. अर्जात ग्राहकाने दिलेली माहिती कागदपत्रांद्वारे तपासून पाहिली जाते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच ग्राहकांना बँक सेवा देऊ शकतात. सर्व कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे. जर कुठल्याही ग्राहकाने KYC केली नसेल तर बँक किंवा सेवा प्रदाता सेवा नाकारू शकतात. नियमांनुसार, नवीन ग्राहक आणि जुन्या ग्राहकांना केवायसी प्रक्रियेचे पालन करावे लागते. जुन्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळोवेळी केवायसी अपडेट करावी लागते.
 
केवायसी महत्वाचे का आहे?
केवायसीमध्ये संभाव्य जोखमींचे मूल्यांकन करण्यासाठी ग्राहकाची ओळख, पत्ता आणि आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जाते. बँका, वित्तीय संस्था किंवा सेवा प्रदाते यांचा मुख्य उद्देश आपला ग्राहक मनी लाँड्रिंग, दहशतवादी निधी किंवा इतर बेकायदेशीर घडामोडींमध्ये गुंतलेला नाही ना? याची खात्री करणे आहे.

अशा परिस्थितीत बँक पुन्हा केवायसी दस्तऐवज मागू शकते
खाते उघडताना, तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा वैध कागदपत्रांच्या विद्यमान सूचीमध्ये समाविष्ट असलेले कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज सबमिट केले नसल्यास बँक तुमच्याकडून नवीन केवायसी कागदपत्रे मागू शकते. याशिवाय, तुम्ही केवायसी म्हणून सबमिट केलेल्या कागदपत्रांची वैधता कालबाह्य झाली असल्यास या स्थितीतही बँक तुमच्याकडून नवीन KYC कागदपत्रे मागू शकते.
 

Web Title: what is kyc why is it important to redo your kyc all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.