विमा हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. पण विमा घेत असताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्या पाश्चात विमा आपले नातेवाईक घेऊ शकतात, तुमचे पैसे दुसरेच हडप करतील अशी भीती वाटते का? ब्रिटीश काळातील कायदा तुम्हाला हमी देईल की तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या विम्याचे पैसे फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांसाठीच उपयोगी पडतील.
१८७४ चा 'विवाहित महिला मालमत्ता कायदा' आहे. त्याला MWPA असेही म्हणतात. जर तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स या कायद्याच्या कक्षेत घेत असाल, तर तुमचा मृत्यू झाल्यास, फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांना विम्याचे पैसे मिळतील. ना नातेवाईक ते हडप करू शकणार नाहीत आणि कोणतीही बँक किंवा कर्ज कंपनी ते जप्त करू शकणार नाहीत.
Mutual Funds चे दोन प्रकार; एकामध्ये अधिक 'रिस्क', दुसऱ्यात सगळंच 'मिक्स'
विवाहित महिला मालमत्ता कायद्याचे कलम ६ हे सुनिश्चित करते की विवाहित स्त्री किंवा तिच्या मुलांना तिच्या पतीच्या विम्याची संपूर्ण रक्कम मिळेल. या कायद्यानुसार, कोणताही सावकार किंवा कोणीही नातेवाईक घेतलेल्या मुदतीच्या विमा पॉलिसीच्या दाव्याच्या रकमेवर दावा करू शकत नाही. तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी MWP कायद्यांतर्गत घेतलेल्या पॉलिसीचे पैसेही कोर्ट जप्त करू शकत नाही.
विम्याच्या बाबतीत, MWP कायदा ट्रस्टप्रमाणे काम करतो. अशा परिस्थितीत पॉलिसीवर फक्त ट्रस्टीचे नियंत्रण असते. या रकमेसाठी फक्त तेच दावा दाखल करू शकतात. यासाठी, मृत्युपत्रात सहभागी असलेला कोणीही या रकमेवर दावा करू शकत नाही, ही रक्कम फक्त पुरुषाच्या पत्नी आणि मुलांसाठी आहे.
यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही मुदतीचा विमा खरेदी करता तेव्हा तुम्ही तुमच्या विमा सल्लागाराला याबद्दल विचारले पाहिजे. यासाठी फॉर्ममध्ये आधीपासूनच एक पर्याय आहे, ज्यावर तुम्हाला फक्त टिक करून तुमची संमती द्यावी लागेल. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जर तुम्ही MWP कायद्यांतर्गत पॉलिसी घेतली असेल, तर ती नंतर बदलता येणार नाही.