Lokmat Money > बिझनेस न्यूज > बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

नोकरदारांना अनेकदा बेसिक, नेट आणि ग्रॉस सॅलरीची माहिती नसते. या तिघांमध्ये फरक आहे. याबाबतच्या माहितीअभावी अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:57 AM2023-04-09T08:57:47+5:302023-04-09T08:58:31+5:30

नोकरदारांना अनेकदा बेसिक, नेट आणि ग्रॉस सॅलरीची माहिती नसते. या तिघांमध्ये फरक आहे. याबाबतच्या माहितीअभावी अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन ...

What is the difference between basic gross and net salary Know in simple words | बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

नोकरदारांना अनेकदा बेसिक, नेट आणि ग्रॉस सॅलरीची माहिती नसते. या तिघांमध्ये फरक आहे. याबाबतच्या माहितीअभावी अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमधील फरक काय हे जाणून घेऊ...

मूळ वेतन
मूळ वेतन हे कर्मचाऱ्याचे मूळ उत्पन्न असते. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार म्हणजे ओव्हरटाइम, बोनस किंवा भत्त्यांसाठी कोणतीही कपात किंवा वाढ करण्यापूर्वी त्यांना दिलेली रक्कम आहे. मूळ उत्पन्नामध्ये बोनस, नुकसान भरपाई किंवा कंपनीकडून मिळणारा इतर कोणताही लाभ समाविष्ट नाही. मूळ वेतन हा कर्मचाऱ्याच्या पगाराचा पाया आहे. पदोन्नतीमुळे मूळ वेतनात वाढ होऊ शकते. कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या किमान ५० ते ६० टक्के असावी.

ग्रॉस सॅलरी
एखाद्या व्यक्तीचा ग्रॉस पगार म्हणजे कोणत्याही कपातीपूर्वी दिलेला वार्षिक किंवा मासिक पगार. एकूण पगारामध्ये मूळ वेतन, एचआरए, पीएफ, रजा प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता, व्यावसायिक कर इत्यादींचा समावेश होतो. पीएफ, वैद्यकीय दावे इत्यादींसाठी कोणतीही वजावट नाही.

नेट सॅलरी
नेट सॅलरी किंवा अन्य खर्च काढून टाकल्यानंतर मिळालेल्या रकमेची बेरीज असे आहे. याला टेक-होम सॅलरी म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजेच तुमच्या खात्यात येणारा पगार असतो त्याला नेट सॅलरी असे म्हणतात. तुमच्या एकूण कपातीनंतर ती तुमच्या खात्यात जमा केली जाते.

Web Title: What is the difference between basic gross and net salary Know in simple words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.