Lokmat Money > बिझनेस न्यूज > PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो?

PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो?

PAN आणि PRAN हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे निरनिराळं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:47 PM2023-10-10T16:47:14+5:302023-10-10T16:47:53+5:30

PAN आणि PRAN हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे निरनिराळं आहे.

What is the difference between PAN and PRAN Where are these important documents used | PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो?

PAN आणि PRAN मध्ये फरक काय? या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा उपयोग कुठे होतो?

PAN आणि PRAN हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे निरनिराळं आहे. विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी दोन्ही महत्त्वाचे आहेत. पर्मनंट अकाऊंट नंबर (PAN) हा १०-अंकी डिजिटल युनिक नंबर आहे. तर पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) हा १२-अंकी डिजिटल युनिक नंबर आहे. भारतातील सर्व करदात्यांना पॅन अनिवार्य आहे.

आयकर विभागानं जारी केलेलं पॅनकार्ड सर्व टॅक्स संबंधित उद्देशांसाठी आवश्यक आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी PRAN कार्ड महत्त्वाचं आहे.

पॅन म्हणजे काय?
आयकर विभागाद्वारे जारी केलेला, पॅन किंवा पर्मनंट अकाऊंट नंबर हा युनिक दहा अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. सर्व करदात्यांना दिलेल्या युनिक नंबरच्या मदतीनं, विभाग सर्व कर-संबंधित व्यवहार आणि माहिती रेकॉर्ड करण्यास मदत करतो. आयटीआर भरणे, रिटर्नचा दावा करणं आणि सुधारित रिटर्न भरणं इत्यादी विविध आयकर संबंधित कामांसाठी सर्व करदात्यांना पॅन अनिवार्य आहे.

पीआरएएन काय आहे?
परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर किंवा PRAN हा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडद्वारे (NSDL) जारी केलेला १२-अंकी क्रमांक आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत सर्व सदस्यांसाठी हे अनिवार्य आहे. PRAN NPS गुंतवणुकीशी संबंधित सर्व व्यवहारांना ट्रॅक करण्यासाठी आणि पेन्शन लाभांचा दावा करण्यात मदत करते.

पॅन, पीआरएएनमध्ये फरक काय?
एखाद्या व्यक्तीकडे PRAN अंतर्गत दोन प्रकारची NPS खाती असू शकतात ज्यात Tier-I आणि Tier-II यांचा समावेश आहे.

PRAN, जे सर्व विद्यमान आणि नवीन NPS सदस्यांसाठी एक ओळख म्हणून काम करते, त्यांना त्यांच्या पेन्शन निधीला ट्रॅक ठेवण्यास देखील मदत करते.

हे एक युनिक आयडी म्हणून काम करते आणि सर्व NPS गुंतवणूकदारांना जारी केलं जातं.

NSDL पोर्टलवर PRAN साठी अर्ज सादर केले जाऊ शकतात.

PRAN साठी अर्ज करण्यासाठी सदस्यांना रीतसर भरलेला अर्ज, फोटो आणि KYC कागदपत्रे सादर करावी लागतात.

PRAN रेकॉर्ड सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीद्वारे (CRA) ठेवला जातो 

ग्राहकाकडे फक्त एक PRAN खातं असू शकतं.

पॅन कार्ड
पॅनचा वापर आयकर-संबंधित सर्व व्यवहारांसाठी आणि इतर अनेक आर्थिक व्यवहारांसाठी तसेच गुंतवणुकीसाच्या कामांसाठी केला जातो.

याचा वापर कर भरणा संबंधित आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्ती आणि व्यावसायिक संस्था करतात.

हे वैध केवायसी दस्तऐवज म्हणून काम करते.

पॅनसाठी NSDL पोर्टल किंवा ई-फायलिंग पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

पॅनसाठी अर्ज करण्यासाठी, करदात्यांना आयडी प्रुफ, पत्ताच्या पुरावा, फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे.

आयकर विभागाकडून पॅनचे रेकॉर्ड ठेवले जातात.

सध्याच्या कर कायद्यानुसार एकापेक्षा जास्त पॅन ठेवण्याची परवानगी नाही.

Web Title: What is the difference between PAN and PRAN Where are these important documents used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.