Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, कसं बदलतं कॅलक्युलेशन; एका दिवसामुळे कमी होतो रिटर्न

PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, कसं बदलतं कॅलक्युलेशन; एका दिवसामुळे कमी होतो रिटर्न

केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:02 PM2023-11-19T14:02:34+5:302023-11-19T14:03:25+5:30

केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. 

What is the importance 5th date every month in PPF how does the calculation change Less return in one day know details | PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, कसं बदलतं कॅलक्युलेशन; एका दिवसामुळे कमी होतो रिटर्न

PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, कसं बदलतं कॅलक्युलेशन; एका दिवसामुळे कमी होतो रिटर्न

PPF Investment Formula: केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. लोक या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करतात आणि त्यांच्या भविष्यासाठी पैसे जमा करतात. याद्वारे कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये (PPF Scheme Latest Update) देखील गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे.

PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ५ तारखेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याची पाच तारीख लक्षात घेऊन तुम्ही पैसे जमा केले तर तुम्हाला होणारा नफाही वाढू शकतो. केंद्र सरकारनंही याबाबत जनतेला सूचना दिली होती. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या महिन्याच्या व्याजाचा लाभही मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही २० एप्रिल रोजी पैसे जमा केले तर तुम्हाला फक्त ११ महिन्यांसाठी व्याज दिलं जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही ५ एप्रिलला गुंतवणूक केली तर तुम्हाला संपूर्ण १२ महिन्यांसाठी व्याजाचा लाभ मिळेल. यामध्ये जवळपास १०,६५० रुपये नफा होऊ शकतो.

किती रक्कम जमा करता येते?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्षभरात जास्तीत जास्त ५ लाख रुपये जमा करता येतात. पाच तारखेनंतर जमा केलेल्या पैशांवर पुढील महिन्यात व्याज मिळेल. तसंच पाच तारखेपर्यंत केलेली रक्कम त्याच महिन्याच्या व्याजात गणली जाईल. एखादी व्यक्ती केवळ एकदाच पीपीएफ खातं उघडू शकते.

काय आहे नियम?
१२ डिसेंबर २०१९ नंतर जर एखाद्या व्यक्तीनं एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर ती बंद केली जातील अशी माहिती केंद्र सरकारकडून आधीच देण्यात आली आहे. यासोबतच जमा रकमेवर कोणतंही व्याज मिळणार नाही. पीपीएफ खाती देखील मर्ज करता येत नाहीत.

Web Title: What is the importance 5th date every month in PPF how does the calculation change Less return in one day know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.