Lokmat Money > बिझनेस न्यूज > गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

wheat and flour price : गहू आणि पिठाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेटही वाढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:32 PM2022-09-29T20:32:02+5:302022-09-29T20:33:33+5:30

wheat and flour price : गहू आणि पिठाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेटही वाढले आहे.

what is the plan of government to control increasing wheat and flour price | गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गहू आणि पिठाच्या किमतीत वाढ झाली आहे. देशातील गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. गहू आणि पिठाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेटही वाढले आहे.

गेल्या एका महिन्यात गव्हाच्या किमती 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे, जर तुम्ही पिठाच्या किमतींवर नजर टाकली तर गेल्या 1 महिन्यात त्याची किंमत 5 टक्के वाढली आहे. गहू आणि पिठाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारही अॅक्शन मोडमध्ये आहे. सरकार किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

या वृत्ताबाबत अधिक माहिती देताना सीएनबीसी-आवाजचे असीम मनचंदा म्हणाले की, गहू आणि पिठाच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. गेल्या एका महिन्यात गव्हाच्या किमतीत 3 टक्के, तर पिठाच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सरकार किमतींवर लगाम घालण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे.

1 वर्षात गव्हाच्या किमती 15 टक्के वाढल्या 
गेल्या 1 वर्षातील आकडेवारी बघितली तरी भाव खूप वाढले आहेत. जर आपण गहू आणि पिठाच्या किमतीची एक वर्षापूर्वीच्या किमतीशी तुलना केली तर 1 वर्षात गव्हाच्या किमती 15 टक्के वाढल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण पिठाबद्दल बोललो तर 1 वर्षात पिठाच्या किमती 20 टक्के वाढल्या आहेत, असे असीम मनचंदा यांनी सांगितले.

सरकार लवकरच गव्हावरील आयात शुल्क कमी करू शकते
सणासुदीच्या काळात गहू आणि पिठाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सरकार लवकरच गव्हावरील आयात शुल्क कमी करू शकते. सरकारच्या आयात शुल्कात कपात केल्याने किमतींवर लगाम बसू शकतो, त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांना दिलासा मिळू शकतो. सध्या गव्हावर 40 टक्के आयात शुल्क आकारले जाते, असे असीम मनचंदा म्हणाले.

एफसीआयचा स्टॉक गेल्या 5 वर्षातील नीचांकी पातळीवर 
याचबरोबर, सध्या अन्नधान्याच्या बाबतीत एफसीआयचा साठाही खालच्या पातळीवर पोहोचला आहे. सध्या एससीआयकडे 492 मेट्रिक टन धान्य साठा पडून आहे. आकडेवारीनुसार, यावेळी एफसीआयचा स्टॉक गेल्या 5 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. हे पाहता सरकार लवकरच किमतींवर लगाम घालण्यासाठी पावले उचलू शकते, असेही असीम मनचंदा यांनी सांगितले.

Web Title: what is the plan of government to control increasing wheat and flour price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.