Join us

परदेशात जायचंय, तत्काळ पासपोर्ट मिळेल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:45 AM

सामान्य पासपोर्टसाठी अनेक दिवस लागतात. याच्या तुलनेत तत्काळ पासपोर्ट कमी दिवसात काढून मिळतो. मात्र, नेमक्या कोणत्या कारणासाठी तत्काळ पासपोर्ट हवा आहे, याची कारणे सांगावी लागतात. संबंधित माहिती द्यावी लागते.

नवी दिल्ली : परदेशात जायचे असेल तर व्हिजा आणि पासपोर्ट गरजेचे असतात. परदेशात केवळ फिरण्यासाठी जायचे असेल लोक संपूर्ण कुटुंब किंवा मित्रपरिवारासाठी पासपोर्टसाठी आधीच अर्ज करून ठेवतात. परंतु उद्भवलेल्या गंभीर आजारावर उपचार किंवा अचानक निघालेल्या महत्त्वाच्या कामासाठी परदेशात जावे लागले तर तत्काळ काढण्याची सुविधा असते का आणि तो किती दिवसात मिळतो, यासाठी नेमके काय करावे लागते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

सामान्य पासपोर्टसाठी अनेक दिवस लागतात. याच्या तुलनेत तत्काळ पासपोर्ट कमी दिवसात काढून मिळतो. मात्र, नेमक्या कोणत्या कारणासाठी तत्काळ पासपोर्ट हवा आहे, याची कारणे सांगावी लागतात. संबंधित माहिती द्यावी लागते.

गंभीर आजारावर उचपार, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स, स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी होणे आदी कारणांसाठी तत्काळ पासपोर्ट कार्यालयात तुम्हाला अर्ज करता येतो.

सामान्य पासपोर्ट देण्यापूर्वी पोलिस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते मात्र तत्काळमध्ये आधी पासपोर्ट जारी केला जातो नंतर पोलिस पडताळणी केली जाते.पासपोर्टसाठी सरकारने एक ॲप तयार केले आहे परंतु तत्काळ पासपोर्टसाठी अधिकृत वेबसाईटद्वारेच अर्ज करावा लागतो.

२० ते ४५ दिवस सामान्य पासपोर्ट तयार करण्यासाठी लागतात.

७ ते १४ दिवसात तत्काल पासपोर्टसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

अर्जासाठी नेमके काय करावे?

पासपोर्टसाठी अससेल्या अधिकृत वेबसाईटवर यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

त्यावर ‘फ्रेश’ आणि ‘रिइश्यु’ असे दोन पर्याय असतात. त्यातील ‘फ्रेश’ हा पर्याय निवडावा.

दिलेल्या स्कीममध्ये तत्काळ हा पर्याय निवडावा.

लिंकवरील फॉर्म डाऊनलोड करावा आणि ऑनलाईन भरावा. 

शुल्क भरून मिळालेल्या पावतीची प्रिंट काढून घ्यावी.

जवळच्या पासपोर्ट सेवा कार्यालयात पासपोर्टसाठी ॲपॉईंटमेंटसाठी वेळ घ्यावी.

पासपोर्ट सेवा कार्यालयात दिलेल्या तारखेला जाऊन तुमचा

पासपोर्टचा अर्ज द्यावा. तिथे

कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया  पूर्ण करून घ्यावी.

टॅग्स :पासपोर्ट