जेवढी चर्चा मुकेश अंबानी यांच्या उद्योग आणि चॅरिटीसंदर्बात होते, तेवढीच चर्चा होते, ती त्यांच्या अँटिलियाची. अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. या बंगल्यातील आलिशान सुविधा अनेकांना आकर्षित करतात. यासंदर्भात आपण बरेच काही वाचले आणि ऐकलेही असेल. मात्र, मुंबईतील ज्या भागात अँटिलिया आहे, त्या भागात प्रॉपर्टीचे दर काय आहेत? हे आपल्याला क्वचितच माहीत असेल.
किती आहे जमीन आणि फ्लॅटची किंमत -
अँटिलियाच्या जवळपास अनेक व्यावसायिकांची घरे आहेत. येथेच रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस आहे. या या भागात फ्लॅट आणि जमिनीचे दर प्रचंड आहेत. ते समाज आणि स्थानानुसार बदलतात. एका प्रॉपर्टी विकणाऱ्या वेबसाइटच्या हवाल्याने झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील या भागात 2 BHK फ्लॅटची किंमत 6 ते 8 कोटी रुपयांपासून सुरू होते. हा दर 15 ते 20 कोटी रुपयांपर्यंत जातो.
5 BHK फ्लॅटची किंमत -
या लोकेशनला 4, 5 आणि 6 बीएचके फ्लॅट देखील उपलब्ध आहेत. यांची किंमत 40 ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. या भागात नवे कंस्ट्रक्शन कमी होत आहे. येथे नवे कंस्ट्रक्शन जुने टॉवर पाडून केले जात आहे. 27 मंजल्यांच्या अँटीलियामध्ये जिम, स्पा, थियेटर, टेरेस गार्डन, स्वीमिंग पूल, मंदिर, हेल्थ केअर 168 कार पार्किंग आणि 10 लिफ्ट आहेत. 2006 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती आणि ते 2010 मध्ये तयार झाले.