Join us

काय आहे अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न, कोणाला आणि कधी दाखल करता येणार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 5:36 PM

आयटीआर दाखल करण्याची तारीख निघून गेली आहे, पण आजही अपडेटेड रिटर्न दाखल करता येतो.

Income Tax: आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. पण, तुम्ही आजही आयटीआर दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला अपडेटेड रिटर्न फाइल करावा लागेल. यासाठी काही अटी आहेत. आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. अपडेटेड रिटर्न म्हणजे काय आणि कोण भरू शकतो? सरकारने इनकम टॅक्स रिटर्न फायलिंगची नवीन सुविधा सुरू केली आहे, यालाच अपडेटेड रिटर्न म्हणतात. अपडेटेड रिटर्न फाइल करण्यासाठी करदात्याला दंड भरावा लागतो. याचा फॉर्मही वेगळा असतो, ज्याला Form ITR-U म्हटले जाते. 

अपडेटेड रिटर्न म्हणजे काय ?अपडेटेड रिटर्न कोणत्याही असेसमेंट इअरच्या 24 महिन्यांच्या आत दाखल केला जाऊ शकतो. करदात्याने त्या कालावधीसाठी रिव्हाइज्ड किंवा बिलेटेड रिटर्न भरलेला नसला, तरीदेखील त्याला अपडेटेड रिटर्न भरण्याची सुविधा मिळते. याशिवाय, तुम्ही रिटर्न आधीच दाखल केला, पण उत्पन्नाची नोंद करण्यात चूक झाली असेल किंवा फॉर्ममध्ये चूक झाली असेल, तर तुम्ही अपडेट केलेल्या रिटर्नद्वारे तो दुरुस्त करू शकता.

अपडेटेड आयटीआर कोण फाइल करू शकत नाही?झिरो आयटीआर किंवा लॉस आयटीआरचालू असेसमेंट इअरमध्ये फाइल केलेल्या रिटर्नमध्ये एडीट करण्याची शक्यता असावी.जप्ती किंवा चौकशीसंबंधीत घटनांमध्ये कारवाई झाली असल्यास 

जास्त टॅक्स द्यावा लागतोजर अपडेटेड ITR किंवा Form ITR-U 12 महिन्यांच्या आत दाखल केला नाही, तर करदात्याला एकूण कराच्या व्याजावर 25% जास्त रक्कम भरावी लागते. तुम्ही 12 महिन्यांच्या नंतर किंवा 24 महिन्यांच्या आत आयटीआर दाखल केला, तर एकूण कराच्या वाज्यावर 50% जास्त भरावी लागते. 

 

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसायआयकर मर्यादागुंतवणूक