Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेवांचा पुरवठा म्हणजे?

सेवांचा पुरवठा म्हणजे?

आपण ‘वस्तूंचा’ पुरवठा पाहिले. आता ‘सेवेचा पुरवठा’ यामध्ये काय समाविष्ट होते ते पाहूया.

By admin | Published: January 20, 2017 05:47 AM2017-01-20T05:47:23+5:302017-01-20T05:47:23+5:30

आपण ‘वस्तूंचा’ पुरवठा पाहिले. आता ‘सेवेचा पुरवठा’ यामध्ये काय समाविष्ट होते ते पाहूया.

What is the supply of services? | सेवांचा पुरवठा म्हणजे?

सेवांचा पुरवठा म्हणजे?


अ‍ॅड. विद्याधर आपटे
आपण ‘वस्तूंचा’ पुरवठा पाहिले. आता ‘सेवेचा पुरवठा’ यामध्ये काय समाविष्ट होते ते पाहूया.
१. कराराने, भोडेतत्त्वाने, लेखी परवानगीने जमिनीचा ताबा देणे.
२. इमारतीचा व्यवहार ज्यामध्ये कराराने वा भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्यास, ज्याचा उपयोग पूर्णत: किंवा अंशत: व्यवसाय किंवा धंद्यासाठी केला जाईल असे व्यवहार.
३. व्यक्तीच्या वस्तू वा मालावर दुसऱ्या व्यक्तीने केलेली प्रक्रिया.
४. व्यवसायिकाने वस्तू किंवा व्यवसायासाठी वापरलेल्या वस्तूंचा खाजगी कारणासाठी केलेला किंवा दर्शविलेला वापर किंवा अन्य व्यक्तीला व्यवसायाशिवाय वापरासाठी करुन दिलेली
उपलब्धता (मोबदला घेऊन किंवा विनामोबदला) तर असा वापर किंवा वस्तू उपलब्ध करुन देणे म्हणजे सेवेचा पुरवठा.
५. स्थावर मालमत्ता भाड्याने देणे.
६. इमारतीचे, संकुलाचे, स्थापत्य बांधणी / रचना किंवा त्याचा काही भाग याचे बांधकाम केल्यास ज्यामध्ये पूर्णत: किंवा अंशत: संकुल किंवा इमारत ग्राहकाला विकण्याच्या दृष्टीकोनातून बांधली असेल (मात्र ज्या इमारतीचा पूर्णत्त्वाचा दाखला विहित अधिकाऱ्याकडून मिळाला असेल किंवा दुसऱ्या कोणीही त्या इमारतीचा ताबा घेतला असल्या, यापैकी जे पहिले असेल ते)
७.बौद्धिक संपदा अधिकार याचे हंगामी हस्तांतरण किंवा वापरण्याची परवानगी अथवा करमणूकीसाठी केलेले आदान प्रदान.
८.वर्क्स कॉन्ट्रॅक्स अंतर्गत वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सेवा देताना ज्यामध्ये वस्तूचे सुद्धा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तांतरण होते. (मालकीसकट)
वर उल्लेख केलेल्या सर्व व्यवहाराना ‘सेवेचा पुरवठा’ ह्या सदरात आधीच टाकून ठेवलंय.

Web Title: What is the supply of services?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.