Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळत नाही, तेव्हा काय कराल?

सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळत नाही, तेव्हा काय कराल?

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (सिबिल) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिलेल्या चार क्रेडिट माहिती कंपन्यांपैकी सर्वात लोकप्रिय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:18 AM2023-03-22T10:18:18+5:302023-03-22T13:15:59+5:30

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (सिबिल) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिलेल्या चार क्रेडिट माहिती कंपन्यांपैकी सर्वात लोकप्रिय आहे.

What to do when your CIBIL score doesn't get you a loan? | सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळत नाही, तेव्हा काय कराल?

सिबिल स्कोअरमुळे कर्ज मिळत नाही, तेव्हा काय कराल?

सध्या कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना सिबिलच्या नावाने खूप मनस्ताप सहन करावा लागतो. सिबिलसारख्या संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात का? त्यांचे नियामक कोण आहेत? त्यांच्या विरोधातल्या तक्रारी कुठे कराव्यात?

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (सिबिल) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना दिलेल्या चार क्रेडिट माहिती कंपन्यांपैकी सर्वात लोकप्रिय आहे. भारतात TransUnion CIBIL, Equifax, Experian, आणि CRIF High Mark या चार संस्था पतगुणांकनाची माहिती संकलित करणाऱ्या संस्था आहेत. रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) कायदा २००५ अंतर्गत नोंदणी केलेल्या कंपन्यांना विविध सदस्य बँका आणि क्रेडिट संस्थांनी नोंदवलेल्या मागील कामगिरीवर आधारित क्रेडिट रेटिंग किंवा क्रेडिट स्कोअर प्रदान करण्यासाठी अधिकृत केले आहे.  हे क्रेडिट माहिती ब्युरो थेट रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग ऑपरेशन्स आणि विकास विभागाद्वारे नियंत्रित केले जातात. 

सिबिल स्कोअर हा तुमच्या पतगुणांकनाची माहिती देणारा एक अंकीय सारांश आहे. तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितकी तुमचा कर्जाचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. तुमचे सिबिल गुणांकन तुमची आर्थिक पत किती आहे, ते दर्शविते. तुम्ही घेतलेली कर्जे परत करण्याबद्दलच्या नियमिततेचा प्रभाव तुमच्या सिबिलच्या गुणांकनावर पडतो. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची बिले आणि कर्जफेडीचा मासिक हप्ता वेळेवर भरणे महत्त्वाचे आहे.  देणी देण्यास  जितका उशीर होईल तितके तुमचे गुणांकन कमी होऊ शकते. 

सिबिल वर्षातून एकदा कोणतेही शुल्क न घेता सिबिलचे गुणांकन आणि आपल्या पात्रतेबद्दलचा अहवाल देते. सर्वांनीच, विशेषतः ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांनी आपले पतगुणांकन कसे आहे, नियमितपणे तपासणे उपयुक्त असते. पतगुणांकन चांगले येण्यासाठी बिले वेळीच चुकती करणे, परतफेडीच्या मर्यादेनुसार एका वेळी एकच कर्ज  घेणे योग्य ठरते. आपल्या पतगुणांकनात चूक झाली आहे, असे  वाटत असेल तर त्याबद्दल तक्रार करून झालेल्या चुकीची दुरुस्ती करवून घेणे शक्य असते.  कसे ते आपण पुढच्या भागात पाहूया. 

- ग्राहक प्रबोधन आणि संशोधन संस्था, नाशिक  
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

Web Title: What to do when your CIBIL score doesn't get you a loan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.