Join us  

बँक संकटाचा काय होणार परिणाम? ३१ मार्चपूर्वी आठवणीने करा ‘ही’ कामे

By प्रसाद गो.जोशी | Published: March 13, 2023 10:11 AM

गतसप्ताहाच्या उत्तरार्धात बाजारात आलेल्या विक्रीच्या मोठ्या लाटेमुळे आधी झालेला सर्व लाभ वाहून गेला.

प्रसाद गो. जोशी

गतसप्ताहाच्या उत्तरार्धात बाजारात आलेल्या विक्रीच्या मोठ्या लाटेमुळे आधी झालेला सर्व लाभ वाहून गेला. आगामी सप्ताहात अमेरिकेतील चलनवाढीची स्थिती तसेच युरोपियन बँकेचे व्याजदर जाहीर होणार आहेत. भारतातील चलनवाढीची आकडेवारीही भारतातील चलनवाढीची आकडेवारीही राहण्याची शक्यता दिसत आहे. याचा परिणाम आगामी पतधोरणामध्ये व्याजदर वाढीत होणे शक्य आहे. या सर्व घडामोडीमुळे शेअर बाजारात येत्या सप्ताहात अस्थिरता राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिलिकॉन व्हॅली बँकेबाबत आलेली बातमी या सप्ताहाचा प्रारंभ बाजार घसरण्याने करू शकते. त्याचबरोबर अमेरिकेतील चलनवाढीचे आकडेवारी व त्यानंतर होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. याचा बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

गतसप्ताहात परकीय वित्तसंस्था तसेच देशांतर्गत वित्त संस्थांनी खरेदी केलेली दिसून आली. सप्ताहाच्या उत्तरार्धात बाजार खाली येत असताना परकीय वित्त संस्थांनी विक्री केली तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी खरेदी केली.

३१ मार्चपूर्वी आठवणीने करा ही कामे

शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी काही गोष्टी करणे सेबीने बंधनकारक केले आहे. प्रत्येकाने आपला पॅन क्रमांक आणि आधार हे एकमेकांना जोडणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी आपले डिमॅट खाते तसेच म्युच्युअल फंडातील फोलिओ यांना वारसाची नोंदणी करणे अथवा वारस नोंदविणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बँकिंग क्षेत्रशेअर बाजार