विमा घेतल्याने तुमच्यासह कुटुंबाचे जीवन व भविष्य सुरक्षित होते. याचा लहान मुलांपासून ते आपल्या घरातील वयोवृद्धांपर्यंत फायदा होतो. आपण लहान मुलांची विमा पॉलिसी नक्की काढून घ्यावी. यामुळे त्याचे भविष्य सुरक्षित होते. मुलांचे शिक्षण, लग्न आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे यासाठी या विम्याचा मोठा फायदा होतो.
विमा का घ्यावा?
nपालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पॉलिसीतून एकरकमी पैसे मिळतात. यातून मुलाला त्याचे पुढचे शिक्षण चालू ठेवता येईल. आपल्यामागे मुलाचे आणि कुटुंबाचे काय होणार ही चिंता किमान आर्थिक
गरजांपुरती मिटते.
nजर मुलाला पुढील शिक्षण परदेशात घ्यायचे असल्यास पॉलिसी पैसे देते.
nमुलाच्या शैक्षणिक गरजांसाठी पुरेसे पैसे उपलब्ध होतात.
चाइल्ड इन्शुरन्सचे
फायदे काय?
nया योजना सहसा दीर्घ मुदतीसाठी असतात, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी रक्कम जमा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
nजर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर मुलाला विम्याची रक्कम मिळते. यातून गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.
nचाइल्ड इन्शुरन्स करमुक्त आहे. तो आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत येतो. त्यामुळे गुंतवणूक अधिक फायदेशीर होते.
गुंतवणुकीचे फायदे काय?
nचाईल्ड इन्शुरन्स योजनेसोबतच गुंतवणुकीचे फायदेही मिळतात. प्रीमियमचा काही भाग गुंतवणुकीत जातो, तो कालांतराने वाढतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
nतुमच्या उद्दिष्टांनुसार टर्म इन्शुरन्स, युनिट लिंक्ड प्लॅन आणि बचत योजना निवडा.
nरक्कम आणि मुदत याकडे लक्ष द्या.
nआपण पॉलिसीत घेतलेले कव्हरेज मुलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करू शकते का, याचा विचार करा.