Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

एका कार्यक्रमादरम्यान रघुराम राजन यांनी यावर भाष्य केलं. पाहा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:15 PM2024-01-27T12:15:44+5:302024-01-27T12:16:08+5:30

एका कार्यक्रमादरम्यान रघुराम राजन यांनी यावर भाष्य केलं. पाहा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर.

What will India need to do to become a developed economy by 2047? The path told by Raghuram Rajan | २०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

अर्थतज्ज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मार्ग सुचवला आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यासाठी शिक्षण आणि आरोग्यसेवेवर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. भारतानं गेल्या २५ वर्षात सरासरी सहा टक्के विकास दर राखला आहे, ही कोणत्याही देशासाठी सोपी उपलब्धी नाही. मजबूत पाया तयार करण्यासाठी शासन सुधारणांसोबतच शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भर देण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली.

७ टक्क्यांचा विकास दर आवश्यक

कोलकाता साहित्य संमेलनात 'ब्रेकिंग द मोल्ड: रीइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान रघुराम राजन बोलत होते. अर्थतज्ज्ञ रोहित लांबा यांच्यासोबत त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनायचं असेल तर त्याला वार्षिक सात टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर गाठावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पर कॅपिटा इन्कम १० हजार डॉलरपर्यंत वाढवावं लागेल

"सात टक्के वाढीच्या दराने, भारताचं दरडोई उत्पन्न सध्याच्या २,४०० डॉलर्स वरून २०४७ मध्ये १० हजार डॉलर्स पर्यंत वाढेल आणि यामुळे देश निम्न मध्यम-उत्पन्न गटात जाईल," असं रघुराम राजन म्हणाले. भारताला सध्या मिळत असलेला डेमोग्राफिक डिव्हिडंड २०५० नंतर कमी होईल. त्यामुळे भविष्याची दिशा आताच ठरवावी लागणार असल्याचं ते म्हणाले.

Web Title: What will India need to do to become a developed economy by 2047? The path told by Raghuram Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.