मुंबई : मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्सनी सोमवारी व्हॉट्सॲपवर प्रथमच एंड टू एंड खरेदीच्या अनुभवाच्या उद्घाटनाची घोषणा केली. येथे ग्राहक त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटवर जिओ मार्टवरून खरेदी करू शकतात. जागतिक दर्जाचा प्रथम अनुभव असलेला जिओ मार्ट ऑन व्हॉट्सॲप भारतातील वापरकर्त्यांना आणि आधी कधीही ऑनलाइन खरेदी न केलेल्या लोकांना जिओ मार्टच्या संपूर्ण किराणा कॅटलॉग पाहणे, कार्टमध्ये वस्तू टाकणे आणि खरेदी पूर्ण करण्यासाठी प्रदान करणे हे सर्व व्हॉट्सॲप चॅटमधून बाहेर न पडता करता येईल.
मेटाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये मत व्यक्त केले की, ‘आम्ही भारतात जिओ मार्टसोबत आमची भागीदारी सुरू करण्यास उत्सुक आहोत. व्हॉट्सॲपवर आमचा हा पहिलाच एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव आहे. लोक आता चॅटिंग करत जिओ मार्टवरून किराणा सामान खरेदी करू शकतात. बिझनेस मेसेजिंग हे खऱ्या अर्थाने गती असलेले क्षेत्र आहे आणि यासारखे चॅट-आधारित अनुभव येणाऱ्या वर्षांमध्ये लोक व व्यवसायाशी संवाद साधण्याचा मार्ग असतील.’
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘भारताला जगातील अग्रगण्य डिजिटल समाज म्हणून पुढे नेण्याचे आमचे ध्येय आहे. २०२० मध्ये जिओ प्लॅटफॉर्म व मेटाने आपल्या सहयोगाची घोषणा केली तेव्हा मार्क व मी अधिकाधिक लोक व व्यवसाय ऑनलाइन आणण्याचा आणि प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन जीवनात सोयी वाढवणारे खरोखरच नावीन्यपूर्ण उपाय तयार करण्याचा दृष्टिकोन ठेवला. आम्हाला अभिमान वाटतो, असा डिझाइन केलेला नावीन्यपूर्ण ग्राहक अनुभव म्हणजे व्हॉट्सॲपवर जिओ मार्टसोबतचा पहिला एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव. व्हॉट्सॲपवरील जिओ मार्टचा अनुभव लाखो भारतीयांसाठी ऑनलाइन शॉपिंग सुलभ आणि सोयीस्कर करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.’
ग्राहक व्हॉट्सॲपवर जिओ मार्ट नंबरवर फक्त ‘हाय’ पाठवून व्हॉट्सॲपवरून जिओ मार्टवर खरेदी करू शकतात.