मुंबई - भारतात गेल्या दोन वर्षांपासून WhatsApp Pay Beta उपलब्ध आहे. मात्र, परवानगी न मिळाल्यामुळे हे अधिकृत लाँच करण्यात आले नव्हते. आता भारतात व्हॉट्सअप पे लाँच करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात या अॅपचे लाँचिंग झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचेही मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं. डिजिटल इंडिया या प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना मार्क यांनी रिलायन्स इंडियाचे प्रमुख मुकेश अंबानींशी चर्चा केली. त्यावेळी, यासंदर्भात माहिती दिली.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर, काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. त्यातच, मार्क झुकरबर्ग यांनी भारतात गेल्याच महिन्यात व्हॉट्सअप पे लाँच केल्याची माहिती दिली. पार्टनरींग फॉर डिजिटल इंडियाद्वारे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याशी झुकरबर्ग यांनी संवाद साधला. त्यावेळी, भारतात व्हॉट्सअप पे लाँच केल्याचे सांगत, केवळ युपीए कार्यप्रणाली आणि 140 बँकांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. भारतात असे प्रयोग करायला भारत हा प्रधान्यक्रमाने पहिला देश ठरतो, असेही झुकरबर्ग यांनी यावेळी म्हटलं.
We launched WhatsApp Pay in India last month. This was possible because of UPI system & 140 banks which made it easy. India is the first country to do anything like this: Mark Zuckerberg, Facebook CEO during 'Partnering for Digital India' with RIL Chairman & MD Mukesh Ambani pic.twitter.com/RSpxV8A1O4
— ANI (@ANI) December 15, 2020
दरम्यान, WhatsApp Payment भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 400 मिलियन युजर्सला सेफ ट्रान्जक्शन करण्यात मदत करु शकते, असे यापूर्वीच व्हॉट्सअॅप पे च्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी WhatsAppची मालकी असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे WhatsApp आणि Jio मिळून व्हॉट्सअप पे अॅपवर काम करत आहेत.