Join us  

WhatsApp Cashback: व्हॉट्सअॅप 'या' युझर्सना देतंय ३५ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या काय करावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 1:09 PM

WhatsApp वर तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबीयांना पैसे पाठवून ३५ रूपयांचा कॅशबॅक मिळवता येणार आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर आता चॅटिंग आणि मीडिया फाइल्स शेअर करण्यासोबतच पेमेंट्ससाठीही केला जात आहे. WhatsApp ग्राहक त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठवून ३५ रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. तुम्ही हा कॅशबॅक ३ वेळा मिळवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की WhatsApp पेमेंट्स कॅशबॅक प्रमोशन वेगवेगळ्या युझर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल. एकदा प्रमोशन तुमच्यासाठी उपलब्ध झाल्यानंतर, ते केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल. जाणून घेऊया तुम्हाला WhatsApp वर ३५ रुपयांचा कॅशबॅक कसा मिळवता येईल.

जर तुमच्यासाठी कॅशबॅक ऑफर उपलब्ध झाली असेल, तरच तुम्ही पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळवू शकता. जर तुम्हाला एखाद्या कॉन्टॅक्टला पैसे पाठवायचे असतील आणि त्यानं पेमेंटसाठी रजिस्टर केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्याला इन्व्हाइट करावं लागेल. मुख्य म्हणजे कॅशबॅक मिळवण्यासाठी पैसे पाठवण्याची कोणतीही किमान मर्यादा नाही. तीन वेळा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तीन निरनिराळ्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवावे लागतील.

कोणत्या आहेत अटी?

  • तुम्ही किमान तीस दिवसांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत असला पाहिजे. शिवाय WhatsApp Business वर याचा लाभ घेता येणार नाही.
  • तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती जोडून व्हॉट्सअॅप पेमेंट्ससाठी रजिस्टर केलं असणं अनिवार्य आहे.
  • तुम्ही ज्यांना पैसे पाठवत आहात ती व्यक्ती भारतातीलच व्हॉट्सअॅप युझर असावी आणि तिनंही पेमेंटसाठी रजिस्टर केलेलं असावं.
  • तुम्ही व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन वापरणंदेखील यासाठी अनिवार्य आहे. 

कसा मिळेल कॅशबॅक?

  • सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरू करा आणि पेमेंट ऑप्शनवर जा. त्या ठिकाणी Send New Payment वर टॅप करा.
  • यानंतर ज्याला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा. जर त्यांनी WhatsApp पेमेंटसाठी रजिस्टर केलं असेल तर त्यांच्या नावासमोर तुम्हाला गिफ्ट आयकॉन दिसेल. जर तो आयकॉन दिसत नसेल तर तुम्हाला त्याला इन्व्हाइट करावं लागेल.
  • तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे ती टाईप करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर सेंड पेमेंटवर टॅप करून तुमचा युपीआय पिन क्रमांक टाका.
टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅपतंत्रज्ञानपैसा