Join us

WhatsApp आता UPI युजर्स वाढवणार, Phone Pay आणि Google Pay ला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:20 AM

WhatsApp : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपला 100  मिलियन युजर्सपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपची (WhatsApp) कंपनी मेटा आणि व्हॉट्सअ‍ॅप  यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत मर्यादित व्हॉट्सअ‍ॅप आपली पेमेंट सेवा केवळ काही युजर्सपर्यंत पोहोचवू शकत होते, परंतु आता आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा युजर्स बेस वाढवण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपला 100  मिलियन युजर्सपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, या परवानगीनंतर व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर बेसमध्ये 60 मिलियन नवीन युजर्स जोडण्यास सक्षम असेल, ज्यामुळे व्यवसायाला गती मिळेल. तसेच अधिक युजर्स व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटद्वारे एकमेकांशी व्यवहार देखील करू शकतील. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची सेवा केवळ 40 मिलियन युजर्सपर्यंत पोहोचली होती.

नोव्हेंबर 2020 मध्ये एनपीसीआयने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅपला मल्टी-बँक मॉडेल आधारित यूपीआयमध्ये (UPI) प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपला जास्तीत जास्त 20 मिलियन युजर्ससोबत सुरूवात करण्यास सांगितले होते. एका वर्षानंतर एनपीसीआयने ही संख्या दुप्पट करून 40 मिलियन करण्याची परवानगी दिली होती.

'द लाइव्ह मिंट'मधील एका वृत्तानुसार, व्हॉट्सअ‍ॅप 2018 पासून आपल्या बीटा मोडमध्ये फक्त 1 मिलियन युजर्ससह यूपीआय आधारित पेमेंट सिस्टम व्हॉट्सअ‍ॅप पे (WhatsApp Pay) चालवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेटा लोकॅलायझेशनची पॉलिसी होते, म्हणजे देशातच डेटा सेंटर्स उभारण्याचे धोरण. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पॉलिसीच्या सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केल्यानंतर एनपीसीआयने रिझर्व्ह बँकेला कळवले की व्हॉट्सअ‍ॅपने डेटा स्टोरेज नियमांचे पालन केले आहे आणि सेवा थेट केली जाऊ शकते.

Phone Pay आणि Google Pay च्या खूप मागेव्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स फारच कमी असल्याने त्याच्या व्यवहारांची संख्याही खूपच कमी झाली आहे. जर मार्चबद्दल बोललो तर व्हॉट्सअ‍ॅपवर 2.54  मिलियन ट्रान्जक्शन झाले आहेत, ज्यामध्ये 239.78 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. याच कालावधीत गुगल पेवर ( Google Pay) 1.8 बिलियन पेमेंट ट्रान्जक्शन झाले आहेत आणि फोन पेवर (Phone Pay) 2.5 अब्ज पेमेंट ट्रान्जक्शन झाले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या सेवेचा विस्तार केल्यानंतर फोनपे आणि गुगल पे या दोन मोठ्या प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅपव्यवसायतंत्रज्ञानगुगल पे