Join us

राज्यात गहू ठरले सर्वात जोखमीचे पीक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2016 3:09 AM

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २०१५-१६ या वर्षात योजनेत सहभागी रबी पिकांची राज्यातील गावाची यादी प्रसिद्ध केली असून या

नीलेश शहाकार, बुलडाणाकृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २०१५-१६ या वर्षात योजनेत सहभागी रबी पिकांची राज्यातील गावाची यादी प्रसिद्ध केली असून यात गहू हे सर्वात जोखमीचे पीक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बागायतीसाठी १६२४ आणि जिरायतीसाठी ३०२ अशा एकूण १९२६ गावांचा या योजनेत सहभाग करण्यात आला आहे.राष्ट्रीय कृषी विमा योजना २०१५-१६ या वर्षातील रबी हंगामात गहू (बागायती, जिरायत), ज्वारी (बागायती, जिरायत), हरभरा, करडई, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात व रबी कांदा या पिकांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी जोखीमस्तर पीकनिहाय अधिसूचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ, मंडळ गट आणि तालुका किंवा तालुका गटाच्या आधारे गावांची यादी शासनाकडून तयार करण्यात आली. ज्वारीसाठी ६० टक्के जोखीम असून यासाठी १५०९ गावांत विमा संरक्षण देण्यात आले आहे. हरभऱ्याला १३८७ गाव, करडईला ५१८, सूर्यफूलला १२०, भात ३४, भुईमुगाला ५७, तर रबी कांद्याला ९० गावांमध्ये संरक्षण देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ९० गावांमध्ये शेतकऱ्यांनी गव्हाला विम्याचे संरक्षण दिले. जळगाव जामोद तालुक्यात ५ गावे, संग्रामपूर ५, चिखली ११ गाव, बुलडाणा ७, देऊळगावराजा ५, मेहकर १०, सिंदखेडराजा ७, लोणार ६, खामगाव ११, शेगाव ५, मलकापूर ५, मोताळा ७ आणि नांदुरा तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे.