महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असतात. ते सातत्यानं आपल्या सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. याशिवाय त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत. महिंद्रा अँड महिंद्राला नव्या शिखरावर पोहोचवणाऱ्या नेणाऱ्या आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या आयुष्यात एक वेळ आली, जेव्हा त्यांना त्यांच्याच कंपनीतून काढून टाकलं जाण्याची भीती वाटत होती. असाच एक किस्सा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. केवळ एका कारच्या यशावर त्यांची कारकिर्द टिकून होती. त्या एसयुव्ही (SUV) कारनं महिंद्रा कंपनीची वाहनं केवळ सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय केली नाहीत तर आनंद महिंद्राच्या कारकिर्दीतही महत्त्वाची भूमिका बजावली.
महिंद्रांनी शेअर केला किस्साआनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक किस्सा शेअर केलाय. जर महिंद्रा स्कॉर्पिओ ही एसयुव्ही फ्लॉप झाली असती तर संचालक मंडळानं त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला असता, असं त्यांनी नमूद केलंय. जर स्कॉर्पओला यश मिळालं नसतं तर महिंद्रा आज कंपनीचे चेअरमनही नसते. ही कार विश्वासू साथीदार आणि योद्धा असल्याचं म्हणत तिनं कायमच आपल्याला साथ दिल्याचे महिंद्रा म्हणाले. जर ती कार यशस्वी झाली नसती तर संचालक मंडळानं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असता. त्यांनी आपल्या पदाचं आणि यशस्वी करिअरचं संपूर्ण श्रेय स्कॉर्पिओला दिलंय.
काय आहे खास?स्कॉर्पिओ ही कार कंपनीच्य यशस्वी आणि लोकप्रिय झालेल्या कार्सपैकी एक आहे. कंपनीनं २००२ मध्ये ही कार लाँच केली होती. स्कॉर्पिओचं लूक आणि डिझाईन तरुणांना ध्यान्यात ठेवून केलं होतं. या कारच्या डिझायनिंगपासून ते त्याच्या टेस्ट ड्राईव्हपर्यंत प्रत्येक गोष्टीत आनंद महिंद्रांचा सहभाग होता. त्यांनी वैयक्तिकरित्या यात लक्ष घातलं होतं. रोड ट्रायलदरम्यानही ते त्या ठिकाणी पोहोचले होते. नाशिकमध्ये स्कॉर्पिओची ट्रायल घेण्यात आली होती. आनंद महिंद्रांनी याबाबत केलेलं ट्वीट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.