Lokmat Money > बिझनेस न्यूज > Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. पाहा किती आणि कधीपासून यात गुंतवणूक करता येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:16 AM2024-10-30T11:16:50+5:302024-10-30T11:16:50+5:30

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. पाहा किती आणि कधीपासून यात गुंतवणूक करता येऊ शकते.

When is Swiggy s IPO coming when to apply what is the price band Find out what the status is in the gray market | Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची (Zomato) स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा (Swiggy IPO) प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा इश्यू ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल आणि यासाठी ३७१ ते ३९० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. हा ५ नोव्हेंबरला अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. 

या इश्यूअंतर्गत नवीन शेअर्स जारी केले जातील आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्सची विक्रीही केली जाईल. ग्रे मार्केटबद्दल बोलायचं झालं तर कंपनीचे शेअर्स आयपीओच्या अप्पर प्राइस बँडमधून २५ रुपये म्हणजेच ६.४१ टक्के जीएमपी (Gray Market Premium) वर ट्रेड करत आहेत. मात्र, ग्रे मार्केटमधून संकेत देण्याऐवजी आयपीओमधील गुंतवणुकीशी संबंधित निर्णय कंपनीच्या व्यावसायावर घ्यावे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

स्विगी आयपीओचे डिटेल्स

स्विगीचा ११,३२७.४३ कोटी रुपयांचा आयपीओ ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल. या आयपीओमध्ये तुम्ही ३७१ ते ३९० रुपयांच्या प्राइस बँडमध्ये गुंतवणूक करू शकाल. ७५ टक्के इश्यू क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB), १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप ११ नोव्हेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १३ नोव्हेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्सची एन्ट्री होईल. इश्यूचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम आहे. या आयपीओअंतर्गत ४,४९९.०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. 

याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १७,५०,८७,८६३ शेअर्स विकले जातील. यापूर्वी फ्रेश इश्यू साइज ३७५० कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १८.५ कोटी शेअर्सची विक्री केली जाणार होती, परंतु नंतर नवीन इश्यूची साईज वाढविण्यात आली आणि ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत शेअर्सची विक्री कमी करण्यात आली.

पैशांचं काय करणार?

आता आयपीओच्या पैशांच्या वापराबद्दल बोलायचं झालं तर ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. नव्या शेअर्सच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांपैकी १,३४३.५ कोटी रुपये उपकंपनी Scootsy मध्ये गुंतवले जातील. याशिवाय तंत्रज्ञान आणि क्वाड इन्फ्रामध्ये ७०३.४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रँड मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी १,११५.३ कोटी रुपये खर्च केले जातील. उर्वरित रक्कम इनऑर्गेनिक ग्रोथ आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरले जातील.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी?

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा तोटा ४,१७९.३ कोटी रुपयांवरून २,३५०.२ कोटी रुपयांवर आला. या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ३६ टक्क्यांनी वाढून ११,२४७.४ कोटी रुपये झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील जून तिमाहीत कंपनीचा तोटा वार्षिक आधारावर ५६४ कोटी रुपयांवरून ६११ कोटी रुपयांवर पोहोचला, परंतु महसूल ३५ टक्क्यांनी वाढून ३,२२२.२ कोटी रुपये झाला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: When is Swiggy s IPO coming when to apply what is the price band Find out what the status is in the gray market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.