Ratan Tata Untold Story : अगर आपसे कहा जाए कि रतन टाटा के पास कभी फोन करने के लिए भी पैसे नहीं थे और उन्होंने किसी से उधार मांगकर कॉल किया था तो शायद ही किसी को यकीन होगा. लेकिन, बॉलीवुड के शहंशाह अमिताभ बच्चन ने इससे जुड़ा एक सच्चा किस्सा सुनाया. असाच एक अनुभव बॉलिवूडचे 'शहेनशाह' अभिनेत अमिताभ बच्चन यांना आला. ही घटना काही वर्षांपूर्वी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर घडली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रतन टाटा एकाच विमानाने ब्रिटनला गेले होते.
लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या १६व्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा खुलासा केला होता. दिवंगत रतन टाटा यांची आठवण सांगताना बिग बींनी त्यांच्या साधेपणाची झलक दिली होती. रतन टाटा यांच्यासोबत आलेला अनुभव सांगताना अमिताभ बच्चन देखील भावुक झाले होते. हा किस्सा बॉलिवूड सेलिब्रिटी बोमन इराणी आणि फराह खान यांच्यासोबत बोलताना त्यांनी सांगितला.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
केबीसी १६ च्या प्रोमो व्हिडिओमध्ये रतन टाटा यांची आठवण सांगताना बिग बी म्हणाले, 'ती व्यक्ती किती अद्भुत होती हे शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांचा साधेपणा कोणालाही अचंबित करुन टाकू शकतो. एकदा रतन टाटा आणि मी एकाच फ्लाइटने लंडनला जात होतो. आमचे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले. दोघेही विमानतळाच्या बाहेर आलो. पण कदाचित त्यांना घेण्यासाठी आलेले लोक त्यांना दिसले नसावेत.
ह्रदयस्पर्शी घटना
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, 'मी पाहिलं की रतन टाटा कोणालातरी फोन करण्यासाठी पब्लिक बूथकडे निघाले. पण, दुसऱ्याच क्षणी ते माघारी परतले. आणि माझ्याकडे येऊन म्हणाले, अमित जी मी तुमच्याकडून काही पैसे उधार घेऊ शकतो का? माझ्याकडे फोन करायला पैसे नाहीत. रतन टाटा यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. किती साधेपणा होता त्यांच्यात, हे मी कधीच विसरू शकत नाही.'
अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. एका युजरने लिहिले की, जर रतन टाटा सारख्या व्यक्ती, ज्यांच्याकडे बॉलीवूड १००० वेळा विकत घेण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तीने फोन कॉल करण्यासाठी पैसे उसने मागितले तर ते किती महान व्यक्तिमत्व होते याची कल्पना करा. या यूजरने लिहिले की, या काळातील कोणीही रतन टाटा यांना विसरू शकत नाही.