Join us

boAt कंपनीचा IPO केव्हा येणार? खुद्द कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 5:50 PM

'बोट'च्या IPO संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इयरफोन्स आणि हेडफोन्स बनवणारी टेक कंपनी 'बोट'च्या (boAt) IPO संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोटचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी आपल्याला आयपीओ संदर्भात कोणतीही घाई नसल्याचं म्हटलं. तसंच पुढील आर्थिक वर्ष 2024-25 किंवा 2025-26 मध्ये आयपीओ आणता येईल असंही ते म्हणाले.

बोटनं यापूर्वी देखील आयपीओची योजना रद्द केली होती. कंपनीनं 2,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) मसुदा कागदपत्रं सादर केली होती. मात्र, नंतर कंपनीनं आयपीओची कागदपत्रं मागे घेतली. यानंतर कंपनी 2023 मध्ये IPO आणेल अशी अपेक्षा होती.

काय म्हटलंय गुप्ता यांनी?आपल्या स्टार्टअपकडे सध्या पुरेसे भांडवल आहे. एक काळ असा होता जेव्हा स्टार्टअपसाठी आयपीओ आणणं फॅशनेबल नव्हतं. त्यानंतर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. आम्हाला सध्या आयपीओची गरज नाही. हे आपण काही वर्षांनी करू शकतो. हे 2024-25 किंवा 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये केलं जाऊ शकतं. आम्हाला कोणतीही घाई नाही. किमान यावर्षी तरी IPO आणणार नसल्याचं अमन गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसाय