नवी दिल्ली : काॅलड्राॅप्स आणि ५जी सेवेबाबत दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) नाराज असून, यामध्ये सुधारणा करण्याबाबत १७ फेब्रुवारीला सर्व दूरसंचार कंपन्यांसाेबत बैठक बाेलाविण्यात आली आहे.
माेबाइल फाेन वापरकर्ते सातत्याने हाेणाऱ्या काॅल ड्राॅप्सच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आता याबाबत कठाेर भूमिका घेतली आहे. देशात सध्या सुमारे २००हून अधिक शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये सेवेचा दर्जा घसरल्याच्या तक्रारी ट्रायकडे प्राप्त झाल्या आहेत. ट्रायने वारंवार याबाबत दूरसंचार कंपन्यांना विचारणा केली आहे. डिसेंबर महिन्यात याबाबत बैठक घेतली हाेती. मात्र, त्यानंतरही सुधारणा न दिसल्यामुळे ट्रायने आता पुन्हा बैठक बाेलाविली आहे.
सेवांचे मूल्यांकन तसेच देखरेखीची गरज
काॅल ड्राॅप तसेच ५जी सेवांचे मूल्यांकन आणि देखरेखीची गरज असल्याचे ट्रायने म्हटले आहे. १७ फेब्रुवारी राेजी हाेणाऱ्या बैठकीत कंपन्यांची काय कृती याेजना राहणार आहे, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. कंपन्यांकडून यासंदर्भात याेग्य पावले उचलण्यात येतील, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.