Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले

पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले

भारताने रशियाकडून जानेवारी महिन्यात दरराेज १२.७ लाख बॅरल एवढे कच्चे तेल खरेदी केले. सलग चाैथ्या महिन्यात ही खरेदी आखाती देशांच्या तुलनेत जास्त राहिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:29 AM2023-02-07T11:29:40+5:302023-02-07T11:31:41+5:30

भारताने रशियाकडून जानेवारी महिन्यात दरराेज १२.७ लाख बॅरल एवढे कच्चे तेल खरेदी केले. सलग चाैथ्या महिन्यात ही खरेदी आखाती देशांच्या तुलनेत जास्त राहिली आहे.

When will petrol, diesel get cheaper Companies earned profits from overseas sales and received subsidies | पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले

पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले

नवी दिल्ली : भारत रशियाकडून माेठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करीत आहे. ४ महिन्यांपासून ही खरेदी उच्चांकी पातळीवर गेली आहे. रशियाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळत आहे, तर दुसरीकडे अमेरिका व युराेपियन देशांना बाजारभावाने रिफाईन्ड पेट्राेलियम उत्पादनांची विक्री करीत आहे.

भारताने रशियाकडून जानेवारी महिन्यात दरराेज १२.७ लाख बॅरल एवढे कच्चे तेल खरेदी केले. सलग चाैथ्या महिन्यात ही खरेदी आखाती देशांच्या तुलनेत जास्त राहिली आहे. भारताला ५५ ते ६० डाॅलर्स प्रति डाॅलर्स या दराने रशियाकडून कच्चे तेल मिळत आहे, तर बाजार भावानुसार भारत अमेरिका व युराेपमधील देशांना शुद्धीकरण केलेली पेट्राेलियम उत्पादने निर्यात करीत आहे.  यातून कंपन्यांना नफा हाेत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत नाही.

भारतीयांना दिलासा नाही -
- कच्च्या तेलाचे दर गेल्या 
८ महिन्यांमध्ये सुमारे ४०% घटले आहेत. मात्र, त्या तुलनेत देशात पेट्राेल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाही. 
- भारतात इंधनाचे दर काही महिन्यांपासून स्थिर आहेत. जून ते ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत तेल कंपन्यांना ताेटा झाला हाेता. त्याची भरपाई झाल्यानंतरच दरात कपात हाेईल. 

काही दिवसांपूर्वी पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले होते की, तेल कंपन्यांनी स्वत:हून दर स्थिर ठेवले आहेत. डिझेल विक्रीतून कंपन्यांना ताेटा हाेत आहे. त्यामुळे दरात कपात हाेत नाही. ताेटा भरून निघाल्यानंतर कपात हाेईल.

असे घटले कच्च्या तेलाचे दर -
            डब्ल्यूटीआय    रशिया
१० जून           १२२.८        ९९.९८ 
१५ ऑगस्ट       १००.४        ६९.४९
१० ऑक्टाेबर       ९५.१८        ८०.१६
१० नाव्हेंबर       ९२.६१           ७५.६५
२६ डिसेंबर          ८०.६१        ५७.१८
२३ जानेवारी        ७७.६२        ६१.२६
३ फेब्रुवारी            ७३.३९            ५३.५६
    (आकडे डाॅलर्स)

३० हजार काेटींचे अनुदान
तेल कंपन्यांना इंधन विक्रीतून झालेल्या ताेट्याची भरपाई म्हणून केंद्र सरकाने ३० हजार काेटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे दरकपात कधी हाेणार, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

सरासरी : ८९ हजार बॅरल एवढे शुद्ध केलेले पेट्राेल व डिझेल निर्यात केले आहे. 

शुद्ध पेट्राेलियम उत्पादनांची निर्यात 
ऑक्टाेबर - ३.१० लाख
नाेव्हेंबर - २.७७ लाख
डिसेंबर - ३.३६ लाख
जानेवारी - ३.८२ लाख

२८% झाली रशियन तेलाची आयात
युक्रेन युद्ध सुरू हाेण्यापूर्वी भारताची रशियाकडून हाेणारी आयात केवळ ०.२ टक्के हाेती. आता ती २८ टक्के झाली आहे.

इंधन विक्रीतून सरकार मालामाल
सरकारला २०२१-२२ या आर्थिक वर्षात पेट्राेलियम क्षेत्रातून ७.७४ लाख काेटी रुपये महसूल मिळाला. २०२०-२१मध्ये हा आकडा ६.७२ लाख काेटी रुपये एवढा हाेता. त्यातुलनेत घरगुती गॅस विक्रीतून नुकसान झाले असून त्यासाठी २२ हजार काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. 
    - रामेश्वर तेली, राज्यमंत्री


 

Web Title: When will petrol, diesel get cheaper Companies earned profits from overseas sales and received subsidies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.