Join us

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरींनी दिलं उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 2:14 PM

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एका वर्षाहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही.

भारतातपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price) एका वर्षाहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही. त्याच वेळी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत प्रतिक्रिया दिली. जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता असूनही, भारतानं पेट्रोलियम उत्पादनांची परवडणारी किंमत कायम ठेवली. शेजारील देश आणि अनेक मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किंचित वाढ झाली असल्याचे पुरी म्हणाले.

वर्षभराहून अधिक काळ भारताला रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळत आहे, त्यामुळे भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी होतील का? असा प्रश्न पुरी यांना करण्यात आला. सुरुवातीला चांगली सूट होती. पण त्यांनी किमत वाढवायला सुरुवात केली आणि आता तेवढी सवलत मिळत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.

भाजपशासित राज्यात व्हॅट कमीकाही माध्यमांशी संवाद साधताना इंधनाच्या किंमतीवरून सरकारवर टीका केल्यावरून पुरी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भाजपशासित राज्यांच्या तुलनेत त्यांच्या राज्यातील इंधनाच्या किंमती अधिक आहेत. भाजपशासित राज्यात किंमती कमी करण्यासाठी पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर व्हॅट कमी करण्यात आला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :पेट्रोलडिझेलभारत