Lokmat Money > बिझनेस न्यूज > टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिवस आणि प्रोसेस सांगितली

टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिवस आणि प्रोसेस सांगितली

आयकर फाईल भरुन पंधरा दिवस उलटले तरीही अजून रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अपडेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 01:22 PM2024-08-15T13:22:22+5:302024-08-15T13:28:44+5:30

आयकर फाईल भरुन पंधरा दिवस उलटले तरीही अजून रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अपडेट दिली आहे.

When will the tax refund happen? Union Finance Minister Nirmala Sitharaman said in how many days the money will be collected | टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिवस आणि प्रोसेस सांगितली

टॅक्स रिफंड कधी होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिवस आणि प्रोसेस सांगितली

 आयकर फाईल भरुन पंधरा दिवस उलटले तरीही अजून रिफंडचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अपडेट दिली आहे. संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आता देशातील लोकांना फक्त १० दिवसांत आयकर परतावा मिळू लागला आहे. पण आयटीआर दाखल करून २० दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला आहे काहींना अजूनही परतावा मिळालेला नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०१३-१४ या आर्थिक वर्षात सामान्य लोकांना आयकर परतावा मिळण्यासाठी सरासरी ९३ दिवस लागले. पण आता २०२३-२४ मध्ये ही सरासरी वेळ १० दिवसांवर आली आहे. आयकर परतावा मिळण्याची वेळ पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे, बऱ्याच फाईलींमध्ये फक्त १० दिवस परतावा मिळण्यासाठी लागला आहे. 

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! कर्ज महागणार; EMI मध्ये आजपासून बदल, वाचा सविस्तर

तुमचा आयकर परतावा तुमच्या खात्यात केव्हा जमा होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते जेव्हा तुम्ही तुमचे रिटर्न भरता. जर तुम्ही तुमचा आयटीआर शेवटच्या मुदतीवेळी दाखल केला असेल, तर तुमचा परतावा सर्वात उशीर मिळेल. याशिवाय, तुम्ही कोणता ITR दाखल केला आहे, तुमच्या ITR मधील गणना किती गुंतागुंतीची आहे. या सर्व गोष्टींचा तुमच्या परताव्याच्या वेळेवरही परिणाम होतो.

जर तुम्ही ITR-1 फॉर्म भरत असाल, तर तुमच्या आयकर परताव्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिले जाते. याचे कारण म्हणजे ITR-1 सर्वात कमी गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे त्यांच्या छाननीला कमी वेळ लागतो आणि लोकांचे पैसे लवकरात लवकर परत केले जातात. त्याचप्रमाणे, ITR-2 लोकांचे रिफंड यायला जास्त वेळ लागू शकतो आणि ITR-3 लोकांचा रिफंड यायला सर्वात जास्त वेळ लागू शकतो.

१५ वर्षांपूर्वी, देशातील लोकांना त्यांचे आयकर परतावा पैसे परत मिळण्यासाठी ३ महिन्यांपर्यंत वेळ लागत होता. याचे कारण ही प्रक्रिया अगदी मॅन्युअल होती. गेल्या काही वर्षांत, सरकारने आयकर विभागात टेक्नॉलॉजी वापरुन डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला आहे. गेल्या ३ वर्षांत आयटीआर रिफंडची प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे. सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे.यामुळे रिफंड प्रक्रियेलाही वेग आला आहे.

Web Title: When will the tax refund happen? Union Finance Minister Nirmala Sitharaman said in how many days the money will be collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.