Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपण ‘कॉन्सेप्ट’वर प्रेम करतो तेव्हा..

आपण ‘कॉन्सेप्ट’वर प्रेम करतो तेव्हा..

आपण ‘संकल्पने’वर प्रेम करतो तेव्हा..

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30

आपण ‘संकल्पने’वर प्रेम करतो तेव्हा..

When you love 'Concept' .. | आपण ‘कॉन्सेप्ट’वर प्रेम करतो तेव्हा..

आपण ‘कॉन्सेप्ट’वर प्रेम करतो तेव्हा..

ण ‘संकल्पने’वर प्रेम करतो तेव्हा..
पणजी : ‘प्रेम’ ही आयुष्यातील महत्त्वपूर्ण आणि तरल भावना आहे. विविध नातेसंबंधांतील प्रेम मिळवताना प्रत्येक व्यक्तीला अनेक तडजोडी कराव्या लागतात; पण पती-पत्नी यांचे नातेसंबंध परिपूर्ण असावेत, अशी प्रत्येक जोडप्याची भावना असते. मात्र, आपण स्वत:ला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही, तेव्हा आपल्या जोडीदाराला पूर्णपणे कसे समजून घेऊ शकतो? जोडीदारात असलेल्या आपल्या आवडीच्या गोष्टींवर आपण प्रेम करतो; पण आपल्याला न आवडणार्‍या त्याच्यातील सवयींवर आपण प्रेम करूशकत नाही. म्हणजे आपण त्या व्यक्तीवर पूर्णपणे प्रेम करतो का? नाही. आपण आपल्या कल्पनेतील एका संकल्पनेवर प्रेम करतो.
प्रत्येक विवाहित जोडप्याच्या आयुष्यात एकदा तरी विचार येतो की, ‘अरे आपण का या माणसावर प्रेम करतो?’, ‘ मी का हिच्यासोबत माझे आयुष्य जगतोय?’ आणि याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येतोय शेखर झा यांचा हिंदी चित्रपट ‘वेडिंग अँनिव्हर्सरी’. चित्रपटात प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर आणि माही गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात करण्यात आले आहे.
कथालेखक आणि दिग्दर्शक शेखर झा यांनी सर्वसाधारण विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात घडणार्‍या तरल भावनिक विचाराला या चित्रपटाद्वारे वाचा फोडली आहे. भारतीय संस्कृतीत लग्नसंस्कार, कुटुंब आणि जोडप्यांमधील प्रेमभावना यांचा फार मोठा गुंता आहे. प्रेमाची कसोटी ही प्रेमात पडल्यावर नव्हे, तर लग्नानंतर एकत्रित संसार करताना लागते. मी माझ्या जोडीदाराला पूर्णपणे ओळखतो, अशी हमी देणारे अनेक नवरा-बायको आपल्या आसपास असतील; पण एका बाजूने विचार करताना आपण आपल्याच स्वभावाला, विविध घटनांवेळी स्वत:लाच न ओळखू शकणारे आपल्या जोडीदाराला पूर्णपणे ओळखू शकतो. म्हणजे एखाद्या प्रसंगी त्याने अशा पद्धतीने वागावे हे आपण त्याच्याबाबत गृहीत धरतो आणि नातेसंबंध निभावतो. म्हणजेच आपण त्याच्यावर प्रेम न करता एका विशिष्ट संकल्पनेवर प्रेम करतो.
(जोड बातमी आहे..

Web Title: When you love 'Concept' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.