Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगभरातील धनाढ्य कुठे जात आहेत राहायला?

जगभरातील धनाढ्य कुठे जात आहेत राहायला?

Money: नोकरी, तसेच शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यातही अतिश्रीमंत वर्गातील (एचएनडब्ल्यूआय) लोकांचेही स्थलांतर यंदाच्या वर्षात वाढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:00 AM2023-12-01T09:00:17+5:302023-12-01T09:00:42+5:30

Money: नोकरी, तसेच शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यातही अतिश्रीमंत वर्गातील (एचएनडब्ल्यूआय) लोकांचेही स्थलांतर यंदाच्या वर्षात वाढले आहे.

Where are the world's rich going to live? | जगभरातील धनाढ्य कुठे जात आहेत राहायला?

जगभरातील धनाढ्य कुठे जात आहेत राहायला?

नवी दिल्ली : नोकरी, तसेच शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यातही अतिश्रीमंत वर्गातील (एचएनडब्ल्यूआय) लोकांचेही स्थलांतर यंदाच्या वर्षात वाढले आहे. वर्षअखेरपर्यंत जगात सुमारे १ लाख २२ हजार अतिश्रीमंत लोक स्थलांतर करतील, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला.

एचएनडब्ल्यूआय म्हणजे? 
१० लाख डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींना हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स (एचएनडब्ल्यूआय) म्हणतात.

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडला फटका
सन २०१६ मध्ये इंग्लंड युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्यामुळे २०१७-२२ दरम्यान येथून सुमारे १२,५०० अतिश्रीमंत लोक स्थलांतरित झाले.

ग्रीसची प्रगती
ग्रीसने अतिश्रीमंत वर्गासाठी गोल्डन व्हिसा प्रोग्राम सुरू केला. त्याअंतर्गत सहजरीत्या व्हिसा मिळतो. सुमारे १,२०० अतिश्रीमंत लोक ग्रीसमध्ये गेले. 

स्थलांतरामागील हेतू काय? 
बहुतांश अतिश्रीमंत वर्ग हे उद्योग-व्यवसायासाठी स्थलांतर करतात. योग्य व सुलभ करप्रणाली, मुक्त व्यापार धोरण, किमान राजकीय हस्तक्षेप लक्षात घेता स्थलांतर करतात.

 

Web Title: Where are the world's rich going to live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.