Join us

एफडीपेक्षा अधिक व्याज कुठे मिळू शकते? गुंतवणूकदारांना मोठा फायदा शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 9:02 AM

या काळात गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्क :शेअर बाजारात यंदा कमालीची तेजी आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक तब्बल १२ टक्क्यांनी वाढले. मिड कॅप आणि स्मॉलस इंडेक्स आतापर्यंत १८ टक्क्यांनी वाढले आहेत. बहुतांश कंपन्यांनी जूनमध्ये पहिल्या तिमाहीची आकडेवारी जारी केली आहे. पुढील काही दिवसात बाजारात आणखी तेजी दिसण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे या काळात गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळू शकतो. अनेक सरकारी योजना तसेच बचत योजनांवर बँकांनी चांगले व्याज दिले आहे.

काही खासगी कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी झालेल्या नफ्यातील काही भाग लाभांशाच्या रुपाने देत असतात. असा कंपन्यांना डिव्हिडेंट यिल्ड स्टॉक असे म्हटले जाते.

योजना    वार्षिक व्याज 

पीपीएफ    ७.१ टक्के एसीएसएस    ८.२ टक्के सुकन्या समृद्धी    ८.० टक्के किसान विकास पत्र    ७.५ टक्के एनएससी    ७.७ टक्केमासिक बचत      ७.४ टक्के वार्षिक बचत    ६.८ टक्के पंच वार्षिक बचत    ७.५ टक्के

खासगी कंपन्यांनी दिलेला लाभांश

वेदांता             २८.३ टक्के हिंदुस्तान झिंक          २५.७ टक्के सनोफी इंडिया          ११.९ टक्के स्वराज इंजिन          १०.४ टक्के

पीएसयूंनी किती लाभांश दिला?

आरईसी ११.३०%इंडियन ऑइल १०.९०%कोल इंडिया १०.३३%स्टील अॅथॉरिटी १०.२८%एनएमडीसी ८.६०%पॉवर कॉर्पोरेशन ८.५०%ओएनजीसी ८.४५%पीटीसी ८.४३% 

टॅग्स :गुंतवणूकबँकिंग क्षेत्रशेअर बाजार