Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ रुपये लीटर पेट्रोल! पाण्यापेक्षाही स्वस्त दरात इंधन विक्री, नेमकं कुठं आणि कसं काय?

१ रुपये लीटर पेट्रोल! पाण्यापेक्षाही स्वस्त दरात इंधन विक्री, नेमकं कुठं आणि कसं काय?

भारतात पेट्रोलच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांच्या घरखर्चाचं बजेट बिघडलं आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा अधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 03:00 PM2022-11-21T15:00:19+5:302022-11-21T15:02:16+5:30

भारतात पेट्रोलच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांच्या घरखर्चाचं बजेट बिघडलं आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा अधिक आहे.

where is the cheapest petrol in the world in venezuela less than 2 rupees liter | १ रुपये लीटर पेट्रोल! पाण्यापेक्षाही स्वस्त दरात इंधन विक्री, नेमकं कुठं आणि कसं काय?

१ रुपये लीटर पेट्रोल! पाण्यापेक्षाही स्वस्त दरात इंधन विक्री, नेमकं कुठं आणि कसं काय?

भारतात पेट्रोलच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांच्या घरखर्चाचं बजेट बिघडलं आहे. देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा अधिक आहे. भारतासोबतच इतरही अनेक देशांमध्ये पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण काही देश असेही आहेत की जिथं पाण्याच्या किमतीपेक्षाही कमी किमतीत पेट्रोलची विक्री होत आहे. एका देशात तर पेट्रोलचा दर भारतात विक्री होत असलेल्या माचिसच्या दरा इतका आहे. आंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव पाहायचा झाला तर तो ८७ डॉलर प्रती बॅरल इतका ट्रेड करत आहे. तर अमेरिकी कच्च तेल देखील ८० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचलं आहे. 

कच्च्या तेलाचा भाव
कच्च्या तेलाच्या दराचा हिशोब करायचा झाला तर एका बॅरलमध्ये जवळपास १५८.९८७ लीटर पेट्रोल असतं. आता ८७ डॉलरच्या हिशोबानं एक लीटर कच्च्या तेलाची किंमत जवळपास ४५ रुपये इतकी होते. आता ही आकडेमोड झाली जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या खरेदी-विक्रीची. आता जगात सर्वात स्वस्त पेट्रोल नेमकं कुठं मिळतंय याची माहिती जाणून घेऊयात. जगातील काही देशांमध्ये पेट्रोलला गॅसोलीन देखील म्हटलं जातं. 

पेट्रोल आणि गॅसोलीनमधील फरक काय?
पेट्रोल आणि गॅसोलीन प्रत्यक्षात एकच गोष्ट आहे. फक्त नाव वेगवेगळं आहे. यूके, भारत आणि इतर काही देशांमध्ये पेट्रोल असं संबोधलं जातं. तर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये पेट्रोलला गॅसोलीन असं संबोधलं जातं. 

कुठं विक्री केलं जातंय सर्वात स्वस्त पेट्रोल?
अमेरिकेचा शेजारील देश व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचा विशाल भांडार आहे. ग्लोबल पेट्रोल प्राइज या संकेतस्थळावरील माहितीनुसार व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल २ रुपये लीटरपेक्षाही कमी म्हणजे जवळपास १.३१ रुपये प्रती लीटर किमतीला विकलं जात आहे. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल सध्या व्हेनेझुएला इथं मिळत आहे. यानंतर लिबिया, इराण, अंगोला, अल्जीरिया आणि कुवेतमध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. लिबियामध्ये पेट्रोलची किंमत २.५४ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. 

इराणमध्ये पेट्रोलची किंमत ४.३४ रुपये प्रतीलीटर इतकी आहे. व्हेनेझुएलाप्रमाणेच इराणकडेही कच्च्या तेलाची मोठी खाण आहे. भारतही इराणचा मोठा ग्राहक आहे. अल्जीरियामध्ये एका लीटर पेट्रोलची किंमत २७.०७ रुपये इतकी आहे. तर कुवेतमध्ये पेट्रोल २७.८९ रुपये प्रतीलीटरनं विकलं जात आहे.

Web Title: where is the cheapest petrol in the world in venezuela less than 2 rupees liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.