Lokmat Money > बिझनेस न्यूज > 5-जी इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक कुठे मिळतो?

5-जी इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक कुठे मिळतो?

5G Internet : भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये ५-जी नेटवर्क सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतात इंटरनेटचा स्पीड तितका चांगला नसल्याने इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये भारत खूप मागे होता. परंतु आता स्थिती खूप बदललेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 07:03 AM2024-04-04T07:03:49+5:302024-04-04T07:04:11+5:30

5G Internet : भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये ५-जी नेटवर्क सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतात इंटरनेटचा स्पीड तितका चांगला नसल्याने इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये भारत खूप मागे होता. परंतु आता स्थिती खूप बदललेली आहे.

Where is the fastest 5G internet speed available? | 5-जी इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक कुठे मिळतो?

5-जी इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक कुठे मिळतो?

नवी दिल्ली - भारतात ऑक्टोबर २०२२ मध्ये ५-जी नेटवर्क सुरू झाले. सुरुवातीच्या काळात भारतातइंटरनेटचा स्पीड तितका चांगला नसल्याने इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये भारत खूप मागे होता. परंतु आता स्थिती खूप बदललेली आहे. आज भारताचा समावेश सर्वात वेगवान  ५-जी नेटवर्क देणाऱ्या टॉप १५ देशांमध्ये झाला आहे. भारतात २०२३ च्या चौथ्या तिमाहीत सरासरी ३०१ एमबीपीएसचा स्पीड दिला जातोय. 

उपलब्धता ५० टक्क्यांनी वाढली 
- भारतात ५-जी नेटवर्कची उपबल्धता आधीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. या नेटवर्कची उपलब्धता वाढल्याने आता बहुतांश कंपन्या ५-जी नेटवर्कचे स्मार्टफोन बाजारात लाँच करताना दिसत आहेत. 
- ५-जी नेटवर्क स्मार्टफोनच्या किमती कमी होत असल्या तरी अनेकजण फोन अपग्रेड करण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत. 

व्हिडीओ स्ट्रिमिंगला जोरदार डिमांड : हायस्पीड ५-जी इंटरनेटची सेवा असल्याने भारतात व्हिडीओ स्ट्रिमिंगची मागणी जोरदार वाढली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ कंटेट पाहणे तसेच गेम खेळणे पसंत करताना दिसत आहेत. ४-जी नेटवर्कवर व्हिडीओ सुरु होण्यास १.९९ सेकंदाचा वेळ लागत असे. ५-जी नेटवर्कमध्ये हा वेळ आणखी कमी होऊन १.१४ सेकंदांवर आला आहे.

Web Title: Where is the fastest 5G internet speed available?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.