Join us

जगात सर्वात जास्त महागाई कुठे आहे? १० व्या क्रमांकावर भारत, या दोन देशांनी विक्रम मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 6:06 PM

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई जोरदार वाढत आहे. महागाई फक्त देशातच नाही तर जगभरातही आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई(inflation) जोरदार वाढत आहे. महागाई फक्त देशातच नाही तर जगभरातही आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक चलनवाढीच्या आकडेवारीनुसार जगातील चलनवाढीचा सर्वाधिक फटका तुर्की आणि अर्जेंटिना या देशांना बसला आहे, तिथे वार्षिक चलनवाढीचा दर ८३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरने एक लाखाचे केले 5 कोटी, तुम्ही घेतला का..?

उद्योगपती आनंद महिंद्रा देखील अनेकदा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचे आकडे शेअर करतात. यात जगभरातील देशांतील महागाई दराची आकडेवारी वार्षिक आधारावर मांडण्यात आली आहे. या अहलावानुसार, उच्च चलनवाढीच्या बाबतीत तुर्की पुढे आहे. या देशात महागाई ८३.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. यानंतर अर्जेंटिनाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. या देशात वार्षिक महागाई दर ८३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

चलनवाढीच्या बाबतीत तुर्की आणि अर्जेंटिना पाठोपाठ नेदरलँड १४.५ टक्के, रशिया १३.७ टक्के, इटली ११.९ टक्के आणि जर्मनी १०.४ टक्के आहे. यूकेमध्येही महागाईचा दर विक्रमी १०.१ टक्क्यांवर आहे. याशिवाय जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत चलनवाढीचा दर वार्षिक आधारावर ८.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील महागाई दर वार्षिक आधारावर ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. भारत दहाव्या क्रमांकावर असून वार्षिक महागाई दर ७.४ टक्के असून, भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया ७.३ टक्के, ब्राझील ७.१ टक्के, कॅनडा ६.९ टक्के, फ्रान्स ६.२ टक्के, इंडोनेशिया ५.९ टक्के आणि दक्षिण कोरिया ५.६ टक्के आहे.

वार्षिक आधारावर महागाई (inflation) दरात थोडीशी वाढ झाली आहे, त्यात चीन, जपान आणि सौदीचा समावेश आहे. सौदीमध्ये वार्षिक चलनवाढीचा दर ३.१ टक्के आहे, तर जपानमध्ये ३ टक्के आहे. चीनमध्ये महागाईचा दर सर्वात कमी वेगाने वाढला असून येथे हा आकडा २.८ टक्के होता.

देशातील ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित किरकोळ चलनवाढ सलग तिमाहीत रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या टारगेटपेक्षा जास्त राहिली आहे. सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्के होती. आता ३ नोव्हेंबर रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या अतिरिक्त बैठकीनंतर रोखण्यात अपयशी ठरण्याची कारणे आणि पुढील प्रयत्नांचा अहवाल सरकारला सादर करेल.

टॅग्स :महागाईभारतभारतीय रिझर्व्ह बँक