लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : डेट फंडांत एसआयपीद्वारे केलेली गुंतवणूक अजूनही बँक एफडी आणि पीपीएफ यांच्या तुलनेत फायदेशीर ठरत आहे. डेट फंडांत जोखीम असली तरी परतावा चांगला मिळतो. यंदा वर्षअखेरीस व्याजदरांत कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफडीचे दर घसरतील. डेट फंडांचा परतावा मात्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डेट फंड का फायदेशीर असतात?
- पाच वर्षांची एफडी मुदतीपूर्वी तोडल्यास दंड भरावा लागतो. डेट फंडात असे काही नसते.
- डेट फंड आज रिडिम केल्यास उद्यापर्यंत खात्यावर पैसे जमा होतात.
- यंदा वर्षअखेरीस व्याजदरांत कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेट फंडांचा परतावा वाढेल. एफडीचे दर मात्र घसरतील.
- पैसे काढले नाही तरी एफडीवर दरवर्षी कर भरावा लागतो. डेट फंड रिडिम केले जात नाही तोपर्यंत कर लागत नाही.
एसआयपीद्वारे गुंतवणूक सर्वोत्तम
एफडीमध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते. डेट फंडांत मात्र दर महिन्याला छोटी छोटी रक्कम एसआयपीद्वारे भरली जाते. दीर्घ कालावधीत त्यातून महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. डेट फंडांचा परतावा एक वर्षासाठी ८.५% ते १६% आहे. तीन वर्षांसाठी ८% ते १७% परतावा मिळाला आहे.
उत्तम परतावा देणारे डेट फंड्स
पाच वर्षे एबीएसएल मीडियम टर्म १२.३२%
बीएनपी परिबास क्रेडिट रिस्क ९.३४%
आयसीआयसीआय क्रेडिट रिस्क ७.८०%
तीन वर्षे एबीएसएल मीडियम टर्म १६.७५%
यूटीआय बाँड १०.६३%
निप्पॉन स्ट्रॅटेजिक डेट ८.८१%
एक वर्षे एबीएसएल डायनेमिक बाँड १०.५०%
एसबीआय मॅग्नम गिल्ट ९.५०%
आयसीआयसीआय ऑल सीजन ८.८७%
गुंतवणूक सुरक्षित असते का?
डेट फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. यामध्ये बॉण्ड, सरकारी रोखे, ट्रेझरी बिले आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच डेट फंडात तुम्ही जी काही गुंतवणूक करता ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते.