Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल  

मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल  

वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कमाल मर्यादा १८ टक्के करण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे वर्णन ‘स्टुपीड’ या शब्दात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:44 AM2017-12-01T00:44:13+5:302017-12-01T00:46:12+5:30

वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कमाल मर्यादा १८ टक्के करण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे वर्णन ‘स्टुपीड’ या शब्दात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले.

Whether Modi's financial adviser is 'stupid' ?, Chidambaram's standing question? | मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल  

मोदींचे आर्थिक सल्लागारही ‘स्टुपीड’ आहेत का?, चिदम्बरम यांचा खडा सवाल  

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कमाल मर्यादा १८ टक्के करण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे वर्णन ‘स्टुपीड’ या शब्दात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले. सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनीजीएसटीचा कमाल दर १८ टक्के असावा, अशी शिफारस केली होती. मग तेही स्टुपीडच आहेत का, असा सवाल चिदम्बरम यांनी केला आहे.
चिदम्बरम यांनी टष्ट्वीट करून मोदींवर टीका केली. त्यांनी म्हटले की, जीएसटीचा कमाल दर १८ टक्के असावा, हा विचार ‘ग्रँड स्टुपीड थॉट’ (अति मूर्ख विचार) असेल, तर सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम आणि इतर अनेक अर्थतज्ज्ञ स्टुपीड ठरतात. पंतप्रधानांना असेच म्हणायचे आहे का?
चिदम्बरम यांनी म्हटले की, अलीकडे अनेक अर्थतज्ज्ञ जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर मर्यादित करण्याचा सल्ला देऊन आपला ‘ग्रँड स्टुपीड थॉट’ जाहीर करीत आहेत.
जीएसटीचा दर जास्तीत जास्त १८ टक्के असावा, अशी मागणी काँग्रेसने सुरुवातीपासून लावून धरली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निवडणूक प्रचारतही हा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काल एका जाहीर सभेत काँग्रेसच्या या प्रस्तावावर टीका केली होती. काँग्रेसचा हा प्रस्ताव म्हणजे ‘ग्रँड स्टुपीड थॉट’ (अति मूर्ख विचार) आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. तथापि, मुख्य आर्थिक सल्लागारांनीच जीएसटीचा कमाल दर १८ टक्के असावा, असे म्हटल्याचे समोर आले आहे.


पंतप्रधानांनी अहवाल वाचला आहे का?

पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढविताना चिदम्बरम यांनी टष्ट्वीटमध्ये लिहिलेय की, पंतप्रधानांनी मुख्य आर्थिक सल्लागारांचा महसूल निरपेक्ष अहवाल वाचला आहे का? मुख्य सल्लागारांनी महसूल निरपेक्ष दर (आरएनआर)
१५ ते १५.५ टक्के करण्याचा सल्ला दिला नव्हता का? सामान्य जीएसटी दर १५ टक्के का होऊ शकत नाही आणि लक्झरी वस्तूंसाठी ‘आरएनआर’च्या वर १८ टक्के दर का होऊ शकत नाही?

Web Title: Whether Modi's financial adviser is 'stupid' ?, Chidambaram's standing question?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.