Join us

‘ड्राय प्रमोशन’ घ्यावे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 8:49 AM

सध्या अनेक कंपन्यांमध्ये ‘ड्राय प्रमोशन’ होत आहेत.

नोकरी करत असलेल्या प्रत्येकाला सर्वांत मोठे सुख काय असते? महिन्याच्या अमूक तारखेला मिळणारा पगार आणि दोन तीन वर्षांत मिळणारे नोकरीतील प्रमोशन यामुळे नोकरदार सुखावून जातो. मात्र जर तुम्हाला ‘ड्राय प्रमोशन’ मिळाले तर? यात पद तर वाढते, त्याचवेळी जबाबदाऱ्याही वाढतात. मात्र पगारवाढ ही पद आणि जबाबदाऱ्यांनुसार होत नाही. पगार केवळ नावालाच वाढतो. त्यामुळे तुम्ही ‘ड्राय प्रमोशन’ घ्यावे की नाही हे जाणून घेऊ...

असे का होते?

सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेसह कार्यालयातील कामाची पद्धत झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कॉर्पोरेट जगाशी संबंधित असलेल्या काम करणाऱ्यांवरही मोठा परिणाम होत आहे. सध्या अनेक कंपन्यांमध्ये ‘ड्राय प्रमोशन’ होत आहेत. जेव्हा कंपनीची स्थिती डळमळीत असते किंवा उत्पन्न कमी झालेले असते असा स्थितीत कंपनीला आणि कर्मचाऱ्यालाही वाचविण्यासाठी ड्राय प्रमोशनचा आधार घेतला जातो. त्यामुळे अशावेळी आपले प्रमोशन नेमके कसे झाले आहे हे समजून घेत त्यानुसार पुढे जा.

चांगले काम करणारे कर्मचारी साेडून जाऊ नये म्हणून...

चांगल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्यासाठी ‘ड्राय प्रमोशन’ ही एक कंपनीची रणनीती असते. ‘ड्राय प्रमोशन’ देताना कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात. कर्मचाऱ्याला पगारवाढीसाठी थोडा वेळ थांबण्यास सांगितले जाते. जर तुम्हाला पद चांगले दिले असेल तर तुम्हाला भविष्यात फायदेही अनेक होतील.

...तर नकारात्मक परिणाम

एकदा ‘ड्राय प्रमोशन’ मिळाल्यानंतर पुन्हा असेच प्रमोशन मिळत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. यात काम करण्याची इच्छा आणि काही नवीन करण्याची इच्छा राहत नाही.

टॅग्स :व्यवसायनोकरी