Join us  

जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 11:09 AM

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला अमेरिकेकडे सोन्याचा सर्वाधिक सोन्याचा साठा आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने   इंग्लंडमधून १०० टन सोने परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. १९९१ पासून पहिल्यांदा अशी प्रक्रिया केली जात आहे. याआधी आरबीआयकडे असलेल्या  सोन्यापैकी ५०० टन परदेशात तर ३०० टन भारतात होते. आता देशात आणि देशाबाहेर ५०-५० टक्के सोन्याचा साठा असणार आहे. रशियाच्या परकीय चलनाच्या साठ्याची मान्यता अमेरिकेने रद्द केल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे भारताने सोने देशात आणण्याचा निर्णय घेतला असावा, असे जाणकार सांगतात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला अमेरिकेकडे सोन्याचा सर्वाधिक सोन्याचा साठा आहे.

भारताचा साठा १८.५१ टनांनी वाढलाभारताकडे ८२२.०९ टन सोने आहे. २०२३ च्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण १८.५१ टनने वाढले आहे.युक्रेनमध्ये युद्ध सुरू असूनही सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत रशिया पाचव्या स्थानावर आहे. चीन काही तिमाहीपासून सोन्याची झपाट्याने खरेदी करीत आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने एकट्या मार्च २०२४ मध्ये ५ टन सोने खरेदी केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकही मागील काही दिवसांपासून सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करीत आहे.

टॉप १० देश कोणते? देश                सोने               मूल्य १. अमेरिका    ८,१३३.४६    ५७९,०५०.१५२. जर्मनी    ३,३५२.६५     २३८,६६२.६४३. इटली      २,४५१.८४     १७४,५५५.००४. फ्रान्स    २,४३६.८८     १७३,४९२.११५. रशिया     २,३३२.७४    १६६,०७६.२५६. चीन    २,२६२.४५    १६१,०७१.८२७. स्वित्झर्लंड    १,०४०.००    ६९,४९५.४६८. जपान    ८४५.९७    ६०,२२७.८४९. भारत    ८२२.०९    ५८,५२७.३४१०. नेदरलँड    ६१२.३५    ४३,६०२.७७(सोने : टनमध्ये, मूल्य : दशलक्ष डॉलर्समध्ये)  

टॅग्स :सोनं