नवी दिल्ली : जगभरात विविध देशांमध्ये होणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या दोन देशांमधील संबंधांचा यावर खूप मोठा परिणाम होत असतो. जगभरातील देशांकडून मागविली जाणारी ४० टक्के शस्त्रास्त्रे एकट्या अमेरिकेकडून निर्यात केली जातात. अमेरिकेकडून सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात केली जाते. ८.७ टक्के शस्त्रात्रे जपानला तर ८.४ टक्के ऑस्ट्रेलियात पाठविली जातात. याबाबतीत अमेरिकेनंतर रशिया, फ्रान्स आणि चीनचा क्रमांक लागतो.
रशियाच्या वाट्यात मोठी घट
- जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाची शस्त्रास्त्रांची निर्यात तब्बल ७४ टक्क्यांनी वाढली आहे. फिलिपाइन्स, भारत आणि थायलंड हे या देशाचे मोठे खरेदीदार आहेत.
- फ्रान्सची शस्त्रास्त्रांची निर्यात मागील पाच वर्षांत ४४ टक्क्यांनी वाढली आहे. भारत हा फ्रान्सचा मोठा खरेदीदार आहे.
- शस्त्रास्त्रांच्या बाबतीत मोठा दबदबा असलेल्या रशियाची निर्यात मात्र ३१ टक्क्यांनी घटली आहे.