Lokmat Money > बिझनेस न्यूज > करबचतीसाठी काेणता फंड ठरेल फायदेशीर?

करबचतीसाठी काेणता फंड ठरेल फायदेशीर?

एकूण परताव्याच्या दृष्टीने पीएमएस फंड अधिक फायदेशीर ठरताे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 06:34 AM2023-07-21T06:34:49+5:302023-07-21T06:35:24+5:30

एकूण परताव्याच्या दृष्टीने पीएमएस फंड अधिक फायदेशीर ठरताे.

Which fund will be beneficial for tax saving? | करबचतीसाठी काेणता फंड ठरेल फायदेशीर?

करबचतीसाठी काेणता फंड ठरेल फायदेशीर?

करबचतीसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. म्युच्युअल फंड हा त्यांपैकीच एक. त्याच प्रकारचा आणखी एक पर्याय आहे ताे म्हणजे, पाेर्टफाेलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) फंड. हा कस्टमाइज्ड पाेर्टफाेलिओ आहे. त्यात बडे गुंतवणूकदारच गुंतवणूक करतात; किमान गुंतवणुकीची रक्कम ५० लाख रुपये आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते करबचतीसाठी म्युच्युअल फंड जास्त फायदेशीर आहे. मात्र, एकूण परताव्याच्या दृष्टीने पीएमएस फंड अधिक फायदेशीर ठरताे.

दाेन्ही फंडांमध्ये फरक काय?
nम्युच्युअल फंडामध्ये 
५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते; तर पीएमएसमध्ये किमान रक्कम ५० लाख रुपये आहे.
nसेबीचे म्युच्युअल फंडावर नियंत्रण आहे. शुल्काची रक्कम सेबी ठरविते; तर पीएमएसबाबत ठाेस मापदंड नाहीत. 
nशेअर बाजारात सहज खरेदी किंवा विक्री करता येत नाही, अशा शेअर्समध्ये पीएमएसची गुंतवणूक हाेते; तर म्युच्युअल फंडाबाबत तसे नाही.

लाभांशाच्या बाबतीत काेण पुढे?
पीएमएस : लाभांश गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात जाेडून टप्प्यानुसार कर आकारला जाताे. 

५००० रुपयांपेक्षा जास्त लाभांश असल्यास 
१०% टीडीएस लागताे.

म्युच्युअल फंड : लाभांश एनएव्हीशी जाेडलेला असताे. एका वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास १० % कॅपिटल गेन कर लागताे.

      कर आकारणीतील फरक (आकडे रुपयांमध्ये)
           विवरण    पीएमएस    म्युच्युअल फंड
गुंतवणुकीची रक्कम    ५० लाख    ५० लाख
अंदाजित परतावा १० टक्के    ५५ लाख    ५५ लाख
शुल्क २ टक्के    १.१० लाख    १.१० लाख
एकूण मूल्य    ५५ लाख    ५३.९० लाख
करपात्र रक्कम    ५ लाख    ३.९० लाख
कर    ७५,०००    ५८,५००

Web Title: Which fund will be beneficial for tax saving?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.