लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना त्यांच्या विविध कंपन्यांकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९.२६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. देशातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत अदानी यांचे वेतन कमी आहे. अदानी एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या बोर्डातील महत्त्वाचे कार्यकारी अधिकारी आणि संचालक असलेले विनय प्रकाश यांनाही गौतम अदानी यांच्यापेक्षा जादा वेतन देण्यात आले आहे. त्यांना वर्षभरात ८९.३७ कोटी इतके वेतन दिले आहे.
- पवन मुंजाळ (हीरो मोटोकॉर्प) ८० कोटी
- राजीव बजाज (बजाज कॅपिटल) ५३.७ कोटी
- सुनील मित्तल (भारती एन्टरप्रा) १६.७ कोटी
- गौतम अदानी (अदानी ग्रुप) ९.२६ कोटी