Join us

Richest City In World: जगातील सर्वात श्रीमंत शहर काेणते? भारतातील या शहरांचा आहे समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 4:58 AM

Richest City In World: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीशांची सातत्याने चर्चा हाेते. मात्र, सर्वाधिक अब्जाधीश असलेले जगातील सर्वात श्रीमंत शहर काेणते, असा प्रश्न पडला असेल.

न्यूयाॅर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीशांची सातत्याने चर्चा हाेते. मात्र, सर्वाधिक अब्जाधीश असलेले जगातील सर्वात श्रीमंत शहर काेणते, असा प्रश्न पडला असेल. तर, न्यूयाॅर्क हे जगातले सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. या शहरात तब्बल तीन लाख ४० हजार कराेडपती आहेत. त्यानंतर जापानची राजधानी टाेकियाे आणि सॅन फ्रॅन्सिकाेचा क्रमांक लागताे. या यादीत भारतातील पाच शहरांचा समावेश असून, मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.

टाॅप ५ श्रीमंत शहरांमधील कराेडपतीलाॅस ॲंजेलिस, हाँगकाँग, बीजिंग, शांघाय, सिडनी ही टाॅप १० मधील इतर शहरे आहेत.

भारतातील टाॅप श्रीमंत शहरेमुंबई हे देशातील सर्वात श्रीमंत शहर आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीचा क्रमांक आहे.

जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत ९७ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.  चार शहरे अमेरिकेतील आहेत. चीनची दाेन शहरे आहेत. सर्वाधिक शहरे भारतातील आहेत. ‘हेनली ॲण्ड पार्टनर्स’ या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे. संबंधित शहरांचे निवासी असलेल्यांचाच कराेडपतींमध्ये समावेश केला.

टॅग्स :आंतरराष्ट्रीयभारत