Join us  

काेणती कर व्यवस्था चांगली? आयकर विभाग स्वत:च सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 8:01 AM

याची माहिती या सुविधेद्वारे करदात्यांना कळू शकेल.‘टॅक्स कॅल्क्युलेटर’मुळे दोन्हींतून योग्य व्यवस्था निवडणे करदात्यांना आता सुलभ होईल. 

नवी दिल्ली - आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर ‘टॅक्स कॅल्क्युलेटर’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्यासाठी नवी कर व्यवस्था फायदेशीर आहे की जुनी, याची माहिती या सुविधेद्वारे करदात्यांना कळू शकेल.‘टॅक्स कॅल्क्युलेटर’मुळे दोन्हींतून योग्य व्यवस्था निवडणे करदात्यांना आता सुलभ होईल. 

असा करता येईल वापर‘टॅक्स कॅल्क्युलेटर’मध्ये दोन्ही व्यवस्था समोर दिसतील. त्यात एकूण वेतन, उत्पन्नचे इतर स्राेत, वर्ष आणि व्यक्तिगत माहिती भरावी लागेल. त्यानंतर कोणती व्यवस्था लाभदायक आहे, हे करदात्यास कळेल.

टॅग्स :इन्कम टॅक्स