Lokmat Money > बिझनेस न्यूज > पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट

पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट

जर तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. यापूर्वी अनेकांनी जी चूक केली आहे तीच चूक तुम्ही करू नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:46 PM2023-08-12T15:46:56+5:302023-08-12T15:47:13+5:30

जर तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. यापूर्वी अनेकांनी जी चूक केली आहे तीच चूक तुम्ही करू नका.

While applying for passport most of the renters make some mistakes hence the application gets rejected avoid this indian passport | पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट

पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट

जर तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. यापूर्वी अनेकांनी जी चूक केली आहे तीच चूक तुम्ही करू नका. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट नाकारण्यात आला असून आता ते दुरुस्त करण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे अनेकांचा परदेशी जाण्याचा प्लॅनही बारगळलाय.

सोयीस्कर आणि वेळेवर पासपोर्टसाठी बनवण्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. पासपोर्ट कार्यालयानुसार, अर्ज करताना पत्त्यामध्ये दोन कॉलम असतात, एक परमनंट अॅड्रेस आणि दुसरा प्रेझेंट अॅड्रेस. ज्यांचं स्वतःचं घर आहे, त्यांना काही अडचण नाही, कारण दोन्हीमध्ये एकच पत्ता येईल. पण जे भाड्यानं राहतात, ते सध्याच्या पत्त्याच्या कॉलममध्येही आपला परमनंट अॅड्रेसच टाकतात. ते भाड्यानं राहत असल्यानं, दिवसा कार्यालयाबाहेर किंवा कामावर असल्यानं पडताळणी करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या पत्त्यावर ते कायमस्वरूपी पत्ता टाकतात आणि इथूनच समस्या सुरू होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पासपोर्ट हा सध्याच्या पत्त्यावरच बनतो. परंतु त्यासोहत परमनंट अॅड्रेसही आवश्यक असतो. पोलीस व्हेरिफिकेशनची चिंता असेल तर पोलीस येण्यापूर्वी तुम्हाला फोन करतात. जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हाच ते तुमच्या घरी येतात.

ओरिजनल पेपर्स आवश्यक
पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर अपॉईंटमेंटच्या तारखेला पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यास ओरिजनल पेपर्स नक्की न्या. अनेकवेळा अर्जदार केवळ ओरिजनल कागदपत्रांच्या नावे केवळ आधारकार्ड घेऊन जातात. परंतु कागदपत्रांअभावी त्यांना परत यावं लागतं. त्यांना पुन्हा अपॉईंटमेंट घेऊन त्यांना पुन्हा जावं लागतं. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी लोकांना आवाहन करतात की, अर्जात जोडलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त, इतर मूळ कागदपत्रेही त्यांनी अपॉईंटमेंटला येताना सोबत आणावीत. अर्जात टाकलेल्या कागदपत्रांशी व्हेरिफाय करण्यासाठी ओरिजनल कागदपत्रंही नेणं आवश्यक आहे.

Web Title: While applying for passport most of the renters make some mistakes hence the application gets rejected avoid this indian passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.